एफआयआर कॉपी मराठीत असल्याने विमा मिळणार नाही; युनियन बँकेच्या धोरणाविरोधात मनसे आक्रमक
नागपूर: नागपुरातील युनियन बँकेच्या मॅनेजरविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. मराठीतील एफआयआर कॉपी नाकारल्याने मनसे आक्रमक झाली आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेतल्याने बँक मॅनेजरने माफी मागितली आहे.
एफआयआर कॉपी मराठीत आहे असं म्हणत अपघात विमा नाकारणाऱ्या युनियन बँक मॅनेजरला मनसेकडून जाब विचारण्यात आला आहे. योगेश बोपचे नावाच्या एका तरुणाचा 8 जुलै रोजी अपघातात झाला होता. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. योगेशकडे युनियन बँकेचं एटीएम होतं. त्यानुसार त्याला अपघात विमा मिळतो. मात्र हाच अपघात विमा मिळावा यासाठी कुटुंबीय बँकेकडे गेले. त्यावेळी बँकेने अपघाताची एफआयआर कॉपी दाखवली. परंतु ही एफआयआर कॉपी मराठीत आहे असे म्हणत बँक मॅनेजरने लाभ देण्यास नकार दिला. यामुळे आता नवीन वाद निर्माण झाला आहे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सेमिनरी हिल्स टीव्ही टावरजवळ असलेल्या युनियन बँकेच्या अधिकाऱ्याला जाब विचारण्यासाठी जाणार आहेत. हेही वाचा: आमदार अमित देशमुखांच्या कंपनीत तब्बल इतक्या कोटींचा आर्थिक गैरव्यवहार; आत्तेभावासह दोघांवर गुन्हा दाखल
नागपूर जिल्ह्यात योगेश बोपचे नावाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. योगेशच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्याकडे युनियन बँकेचे एटीएम कार्ड असल्याने त्यांचे कुटुंबीय अपघाती विमा मिळावा यासाठी बँकेत गेले. त्यानंतर योगेशच्या अपघाती मृत्यूची एफआयआर कॉपी पोलिसांकडून मराठी दिली असल्याने बँकेने त्यांना अपघाती विमा नाकारला. त्यामुळे कुटुंबीय नाराज झाले. महाराष्ट्रात मराठी भाषा वापरायची नाही तर कुठे वापरायची असा संतप्त सवाल योगेशच्या पत्नी आरती यांनी केला आहे.
दरम्यान युनियन बँकेने योगेशचा अपघाती विमा देण्यासाठी वापरलेल्या धोरणामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. योगेशच्या अपघाताची एफआयआर कॉपी पोलिसांनी मराठीत दिली. म्हणून योगेशचा अपघाती विमा नाकारण्यात आला. पोलिसांनी दिलेली एफआयआर कॉपी इंग्रजी किंवा हिंदीत देण्याची मागणी युनियन बँकेकडून करण्यात आली. यावर योगेशच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला आहे. महाराष्ट्रात मराठी भाषा चालणार नाही तर कुठे चालणार असा सवाल मृत योगेश बोपचे यांची पत्नी आरती बोपचे यांनी केला आहे. मनसेने नागपुरातील युनियन बँकेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. योगेशच्या अपघाताची एफआयआर मराठीत असल्याने बँकेच्या मॅनेजरने विमा देण्यास नकार दिला. त्यामुळे आता मनसे युनियन बँकेच्या अधिकाऱ्याला जाब विचारणार आहे.