Kolhapur Crime : एकतर्फी प्रेम, बसमध्ये काढली छेड, उचललं टोकाचं पाऊल...; नेमकं प्रकरण काय ?
बसमधील त्रासाला कंटाळून महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.अल्पवयीन मुलाच्या त्रासाला कंटाळून एका महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. हातकणंगले तालुक्यातील किणी येथे ही घटना घडली. संबंधित अल्पवयीन तरुण बस मधून येत असताना त्रास देत असल्याचा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितलेला होता. आईने पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर आई घरात नसताना आलेल्या तरुणीने गळफास घेऊन आपलं जीवन संपवलं.
आत्महत्येच्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. एकतर्फी प्रेमातून संबंधित तरुण त्रास देत असावा असे चर्चा परिसरात आहेत. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलास ताब्यात घेऊन कोल्हापूर येथील बालसुधारगृहात पाठवलं आहे. पेठवडगाव पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली
या घटनेनंतर ग्रामस्थांनी कॅन्डल मार्च काढून श्रद्धांजली वाहिली. बसमध्ये होत असलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या मुलीला आणि कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी निर्धार ही या मोर्चातून करण्यात आला.