गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात ग

Lalbaugcha Raja 2025 : डॉलर स्वरुपात लालबागच्या राजाला दान; पहिल्याच दिवशी 58 लाख जमा

मुंबई: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाले आहेत. अशातच, गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गणेशभक्तांनी लाखोंच्या संख्येने लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यंदा, भाविकांनी लालबागच्या राजाला सोने आणि चांदी दान केली. 

हेही वाचा: Mumbai Crime News : केशवसाठी मामा ठरला 'कंस', पायाने गळा दाबला; हत्येचं खळबळजनक कारण समोर

गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी या दान केलेल्या वस्तू आणि निधीची मोजणी सुरू होते. ही मोजणी बॅंक ॲाफ महाराष्ट्र आणि जी एस महानगर बॅंकेचे कर्मचारी करतात. विशेष म्हणजे, या दानपेटीत भारतीय नोटांच्या हारासह अमेरिकन डॉलर्सचा हार  देखील होता. यंदा, गणेशोत्सवानिमित्त लालबागच्या राजाला अमेरिकन डॉलर्सचा हार मिळाल्यानंतर चर्चेचा विषय बनला आहे.