एका व्यक्तीकडून हाके यांना आंदोलनासाठी आर्थिक मदत

Laxman Hake: ओबीसी आंदोलन थांबवण्यासाठीचा..., व्हायरल ऑडिओ कॉलनंतर लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया

 

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून नवीन घटना समोर आली आहे. ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होताना पाहायला मिळत आहे. एका व्यक्तीकडून हाके यांना आंदोलनासाठी आर्थिक मदत देण्याची तयारी असल्याचे या कॉलद्वारे ऐकायला मिळत आहे. हाके यांनी संबंधित व्यक्तीसोबत पैशांची चर्चा केल्याचे संभाषण व्हायरल झाले आहे. हाके यांचा ऑडिओ कॉल व्हायरल झाल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान कॉलनंतर लक्ष्मण हाके यांची  प्रतिक्रिया समोर आली आहे. आम्ही ओबीसींसाठी मोठी चळवळ उभी करत आहोत. परंतु ती थांबवण्यासाठी काही लोक कट आणि कारस्थान करत असल्याची प्रतिक्रिया लक्ष्मण हाके यांनी दिली आहे.

लक्ष्मण हाके म्हणाले, "व्हायरल झालेल्या कॉलचे नंबर आहेत. त्या नंबरवरुन कोणी पैसे मागितले असतील किंवा घेतले असतील. तसेच कायदा भंग केला असेल तर आम्हाला उचलून जेलमध्ये टाका. कारण आम्ही ओबीसींसाठी चळवळ उभी करतोय. रात्रदिवस महाराष्ट्रभर फिरतोय, आंदोलन करतोय. कोणी आम्हाला उदार अंत करणाने पाच हजार, 10 हजार देतंय असं म्हणायचं आणि कॉल व्हायरल करायचा. हे फक्त आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न आहे. तसेच आमच्या विरोधात कारस्थान करण्याचा प्रयत्न आहे."