स्थानिकांनी सांगितले की भविष्यात अशा अपघातांचा पुन

Pune Lift Collapses: वाघोलीमधील निवासी इमारतीतील लिफ्ट कोसळली! बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप

Lift Collapses In Pune: पुण्यातील वाघोली भागात मंगळवारी एका निवासी इमारतीत धक्कादायक अपघात घडला. इमारतीतील लिफ्ट अचानक कोसळली. या लिफ्टमध्ये एक लहान मुलगा आणि एकूण सहा जण अडकले. ही घटना लिफ्टमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. तसेच सध्या सोशल मीडियावर या अपघाताचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये दिसतं आहे की, लिफ्ट अचानक वेगाने खाली उतरते आणि नियंत्रण सुटल्याने आतील प्रवाशांना गंभीर धक्का बसतो. तरीही, सर्व प्रवासी सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले. लिफ्टमधील कोणलाही गंभीर दुखापत झाली नाही. या घटनेने रहिवाशांमध्ये इमारतीच्या लिफ्टच्या सुरक्षिततेबाबत मोठी चिंता निर्माण केली आहे.

हेही वाचा - Pune Water Cut: पुण्यात 'या' दिवशी मोठी पाणी कपात! शहराच्या अर्ध्याहून अधिक भागात पाणी पुरवठा बंद राहणार

दरम्यान, या अपघातानंतर सोसायटीतील सदस्यांनी बिल्डरवर निष्काळजीपणाचा आरोप केला असून, पोलिसांकडे औपचारिक तक्रारही नोंदवली आहे. रहिवाशांनी तातडीने लिफ्टची सुरक्षा तपासणी करण्याची आणि दोषपूर्ण भाग बदलून मजबूत सुरक्षा प्रोटोकॉल अमलात आणण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा - Anjali Damania on Anish Damania : अंजली दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँकमध्ये; टीकेनंतर पत्रकार परिषद घेत सांगितला घटनाक्रम

स्थानिकांनी सांगितले की भविष्यात अशा अपघातांचा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियमित देखभाल, तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षित नियंत्रण प्रणाली आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे. या घटनेमुळे इमारतींच्या लिफ्ट्सच्या देखभालीबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढली असून बिल्डरविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.