पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस स

LPG Gas Cylinder Price Hike: एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या; किती रुपयांनी वाढली किंमत? जाणून घ्या

LPG Gas Cylinder Price Hike

LPG Gas Cylinder Price Hike: मार्चचा नवीन महिना आपल्यासोबत अनेक बदल घेऊन आला आहे. यातील मोठा बदल म्हणजे एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर (LPG Commercial Gas Cylinder) 6 रुपयांनी महाग झाला आहे. तथापि, घरगुती सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. अशा परिस्थितीत, होळीपूर्वी एलपीजी गॅस सिलेंडर महाग झाला आहे असे म्हणता येईल. पेट्रोलियम कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती वाढवल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंडियन ऑइल (IOC) ने सिलेंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ केली आहे. वाढलेली किंमत आजपासून लागू झाली आहे. तुमच्या शहरात आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत किती असेल ते जाणून घ्या.

हेही वाचा - EPFO Interest Rate: ईपीएफओच्या व्याजदरात कोणताही बदल नाही, खात्यात जमा पैशांवर किती व्याजदर मिळणार? जाणून घ्या

दिल्ली - दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची किंमत 6 रुपयांनी वाढून 1803 झाली आहे. तर पूर्वी तो 1797 रुपयांना उपलब्ध होते.

कोलकाता - कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर 1913 रुपयांना उपलब्ध आहे, ज्यामध्ये 6 रुपयांची वाढ झाली आहे, पूर्वी त्याची किंमत 1907 रुपये होती.

मुंबई - मुंबईत 1 मार्चपासून व्यावसायिक सिलिंडरची किंमत 1,749 रुपयांवरून 5.5 रुपयांनी वाढून 1755.50 रुपये झाली आहे.

चेन्नई - चेन्नईमध्ये आता व्यावसायिक सिलिंडर 1965 रुपयांना उपलब्ध आहे.

हेही वाचा - 1 मार्चपासून बदलणार आर्थिक नियम! FD, LPG, UPI आणि कर नियोजनावर होणार थेट परिणाम

घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल नाही - 

तथापि, 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. घरगुती गॅस सिलिंडर दिल्लीत 803 रुपयांना आणि मुंबईत 802.50 रुपयांना उपलब्ध आहे. तर लखनौमध्ये ते 840.50 रुपयांना, कोलकातामध्ये 829 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 818 रुपयांना उपलब्ध आहे.