महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध

Eknath Shinde X Account Hack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स हँडल हॅक, पाकिस्तान-तुर्कीचे झेंडे पोस्ट,नेमकं काय झालं?

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अधिकृत एक्स (माजी ट्विटर) हँडलवर शनिवारी रात्री हॅकर्सनी सायबर हल्ला केला. या हल्ल्यात काही काळ त्यांच्या अकाउंटवरून पाकिस्तान आणि तुर्कीचे झेंडे असलेली पोस्ट शेअर करण्यात आली. घटना लक्षात येताच शिंदे यांच्या तांत्रिक पथकाने तातडीने कारवाई करत अकाउंट पुन्हा ताब्यात घेतले. अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या त्यांचे हँडल पूर्ववत कार्यरत असून वापरण्यास सुरक्षित आहे.

हेही वाचा- Nitin Gadkari: 'आरक्षण न मिळणं हेच वरदान' आरक्षण मुद्यावरून नितीन गडकरींचं वक्तव्य चर्चेत 

या घटनेनंतर पुन्हा एकदा सायबर सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. गेल्या काही वर्षांत हॅकिंगच्या घटना वाढल्या असून दूरसंचार, बँकिंग, आरोग्य सेवा आणि ऊर्जा क्षेत्र ही प्रमुख लक्ष्य ठरत आहेत. 2024 मध्ये वझीरएक्स क्रिप्टो एक्सचेंज, बीएसएनएल आणि स्टार हेल्थवरील डेटा चोरीच्या घटना या धोक्याचेच उदाहरण मानल्या जातात.

हेही वाचा- Laxman Hake: ओबीसी आंदोलन नेते लक्ष्मण हाके यांचा कथित ऑडिओ कॉल व्हायरल 

सायबर तज्ज्ञांच्या मते, डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ, कृत्रिम बुद्धिमत्तेचा गैरवापर आणि भूराजकीय तणाव ही हॅकिंगमागची प्रमुख कारणे आहेत. नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक टाळणे, जटिल पासवर्ड वापरणे तसेच फसवणुकीच्या घटनेत तात्काळ हेल्पलाइन 1930 वर संपर्क साधणे किंवा cybercrime.gov.in वर तक्रार करणे आवश्यक आहे. राजकीय नेत्यांनाही या धोक्यापासून सुटका नाही. याआधीही काही मोठ्या नेत्यांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले होते. त्यामुळे सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी डिजिटल सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित होत आहे.