Devendra Fadanvis on Rain Update : मुंबईला रेड अलर्ट ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाबद्दल दिली महत्त्वाची अपडेट
महाराष्ट्रामध्ये पावसाने थैमान घातले आहे. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रुझ, वांद्रे परिसरामध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. येत्या काही दिवसांत पाऊस कायम राहणार असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईत तर स्थिती यापेक्षाही भयंकर आहे. याच मुंबईच्या पावसासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
पावसासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील पावसाचा आढावा घेतला. माध्यमांशी बोलताना यावेळी त्यांनी राज्यभरात पावसाची स्थिती कशी आहे? याची माहिती दिली. तसेच मुसळधार पावसामुळे होणारे नुकसान आणि त्यासाठी राज्य सरकारची तयारी याबाबतही त्यांनी सविस्तर सांगितले. यावेळी बोलताना त्यांनी मुंबईच्या पावसावरही भाष्य केले.
हेही वाचा - Rain Update : मुंबईमध्ये पावसाचे थैमान ! जाणून घ्या कुठे किती पाऊस झाला ?
मुंबईमध्ये किती पाऊस झाला ? सकाळी सहा वाजेपूर्वीच्या 48 तासांत जवळपास 200 एमएम पाऊस पडला. आणि आज सकाळपासून सहा ते आठ तासांत तब्बल 170 एमएम पाऊस पडला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
हेही वाचा -Mumbai Heavy Rain Alert : मुंबईत 'कोसळधार'; तज्ञांनी सांगितलं ढगफुटीसदृश्य पावसाचं नेमकं कारण
लोकल बंद पडल्या नाहीत :
त्याचप्रमाणे, लोकलबद्दल फडणवीस म्हणाले की, कुठेही लोकल पूर्णपणे बंद झालेल्या नाहीत. काही गोष्टींमुळे लोकलचा वेग कमी झालेला आहे. पुढच्या 10 ते 12 तास पावसाचा तीव्र जोर असण्याची शक्यता आहे. मुंबईला रेड अलर्ट मिळालेला आहे. हीच बाब लक्षात घेता दुपारच्या सत्रांत शाळांना आपण सुट्टी दिलेली आहे.