Hight Court on Maratha Reservation Protection : 'उद्या दुपारी 4 वाजता मुंबई खाली करा... उच्च न्यायालयाचा सरकारला आदेश
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतील आझाद मैदानात उपोषण सुरु आहे. आंदोलनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाकडून आज (1 सप्टेंबर) तातडीची सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत उच्च न्यायालयात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.
सरकार आणि आंदोलनकर्ते यांचं म्हणणं ऐकल्यानंतर आता कोर्टाने मोठा आदेश दिला आहे. मुंबईतील रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यावरूव हटवा असे आदेश सरकारला दिले आहे. तसेच आंदोलकांना मुंबईत येण्यापासून थांबवा, उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत ही कारवाई करा असं कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळे आता कोर्टाच्या निर्णयाचा आंदोलनावर काय परिणाम होणार त्याकडे लक्ष लागले आहे.
आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरिक्षण उच्च न्यायालयाने सांगितले. तसेच सदर याचिकेवर उद्या म्हणजे 2 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी होणार आहे.
आदेशाच पालन झालं की नाही ते राज्य सरकारला न्यायालयात सांगाव लागणार आहे. तसेच सीएसएमटी, मरीन ड्राईव्ह, फ्लोरा फाउंटेन आणि दक्षिण मुंबईतील इतर परिसरातून आंदोलकांना हटवण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश दिले आहेत.
कोर्ट काय म्हणालं ? - मराठा आंदोलकांना रस्ता रोको करण्याचा अधिकार आहे का?
- रोड साफ करणार का? रस्ता सोडून आंदोलन करणार का? नियमांचे पालन करणार का?
- पाण्याने भरलेलं ट्रक आझाद मैदानात आहे मग पाण्याचे ट्रक कुठे अडवला?
- गणेशोत्सवात मुंबईत कोंडी व्हायला नको
- मुंबईतले रस्ते मोकळे करा, आंदोलकांना रस्त्यांवरून हटवा
- मुंबईतल्या ज्या ज्या ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आहेत, रस्ते ब्लॉक करण्यात आले आहेत त्या सर्व ठिकाणाहून आंदोलांना उद्यापर्यंत हटवा.
- उद्या संध्याकाळी 4 पर्यंत ही कारवाई करा
कोर्टाचे आदेश - मुंबईत अजूनही बाहेरून आंदोलक लाखोंच्या संख्येने येत असतील तर अश्या सर्व आंदोलकांना मुंबईच्या वेशीवरच थांबवा