Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच होणार जमा
महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. बहिणी अजूनही ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहेत. सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला तरीही ऑगस्ट महिन्याचा हप्ता खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
लाडकी बहीण ही राज्यसरकारची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. याला योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा होतात. मात्र ऑगस्ट महिना पूर्ण सरला तरीही खात्यात पैसे जमा झाले नाहीत. त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा पहिला आठवडा गेला तरीही लाडक्या बहिणीचा हप्ताही जमा झाला नाही. त्यामुळे आता पैसे येण्यास वेळ का लागत आहे? असा प्रश्न उभा राहिला आहे.
यावर आता महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिली आहे. त्या म्हणाल्या की, ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यात वितरीत होईल. लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या सुरु ठेवण्याचा सरकारचा संकल्प आहे. या योजनेचा जो काही लाभ आहे तो अशाचप्रकारे सुरु राहणार आहे".
हेही वाचा - Houthi Attack on Israel Airport : टोकाचा संघर्ष ! इस्राइलच्या विमानतळावर हल्ला, भयंकर व्हिडीओ समोर
त्याचप्रमाणे, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता एकत्रित होणार असल्याच्या चर्चादेखील रंगल्या. मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही.