महत्त्वाची बातमी ! ऐन सणासुदीला पोलिसांच्या सुट्ट्यांमध्ये विघ्न, कामावर व्हावं लागणार हजर
महाराष्ट्रामध्ये सध्या मनोज जरांगे यांचे मराठा आंदोलन चांगलेच पेटले आहे. कालपासून म्हणजे 29 ऑगस्टपासून मुंबईमधील आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. जो पर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. अशातच यानंतर ओबीसी वर्गानेदेखील उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आता आंदोलनकर्त्यांची संख्या अधिक वाढू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे. जरांगेमुळे प्रशासन आताच अलर्ट मोडवर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार दरम्यान यामुळे पोलिसांच्या सुट्ट्या तडकाफडकी रद्द करण्यात आल्या आहेत. सुट्टीवर असलेले, रुग्णनिवेदन, अर्जित रजा, किरकोळ रजा आणि गैरहजर असलेल्या पोलिसांना तातडीने कर्तव्यावर येण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच इतर पोलीस कर्मचारी सुट्टीवर असल्याने कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवर ताण येत आहे, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भभऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता सुट्टीवर असलेल्या आणि मुंबई पोलिसात कार्यरत असलेल्या सर्वच पोलिसांना तत्काळ सेवेसाठी हजर राहावे लागणार आहे.जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारो लोक मुंबईत आले आहेत. त्यांच्या वाहनांची व्यवस्था पाहण्यापासून इतर सर्वच गोष्टींची जुळवाजुळव करावी लागणार आहे