राज्यात मागील 24 तासांमध्ये (13 जून रोजी सकाळपर्यं

Maharashtra Rain update: राज्यात गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 71 मिलीमीटर पाऊस

मुंबई :  राज्यात मागील 24 तासांमध्ये (13 जून रोजी सकाळपर्यंत ) सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक 71 मिमी पाऊस झाला आहे. तर कोल्हापूर  39.8 मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात 37 मिमी, सांगली जिल्ह्यात 36 मिमी आणि नाशिक जिल्ह्यात 25.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज 13 जून 2025 रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) -  ठाणे 10.5, रायगड 15, रत्नागिरी 37,  सिंधुदुर्ग 71,  पालघर 22.2, नाशिक 25.2, धुळे 21.4, नंदुरबार 3.1, जळगाव 9.3, अहिल्यानगर 18.6, पुणे 20.1, सोलापूर 15.7,  सातारा 24.2,  सांगली 36.6,  कोल्हापूर 39.8, छत्रपती संभाजीनगर 20.6, जालना 23.6, बीड 10.6, लातूर 6.3,  धाराशिव 9.6, नांदेड 4.9,  परभणी 8.9,  हिंगोली 19.3, बुलढाणा 13.9, अकोला 8.7, वाशिम 16.7, अमरावती 3.5, यवतमाळ 4.1, वर्धा 3.9, नागपूर 0.3, भंडारा 0.1, गोंदिया 0.1, चंद्रपूर 2.6 आणि गडचिरोली 1.4.

हेही वाचा : Video Before Crash: टेक ऑफपूर्वीचे आनंदाचे क्षण अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं

अतिवृष्टी आणि संभाव्य पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून  एनडीआरएफ, एसडीआरएफ पथकांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

राज्यात अहिल्यानगर जिल्ह्यात झाड पडून एक व्यक्ती मृत व एक व्यक्ती जखमी झाली आहे. वीज पडून सांगली जिल्ह्यात दोन व्यक्ती मृत, जालना जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती  व 12 प्राणी मृत तर एक व्यक्ती जखमी, यवतमाळ जिल्ह्यात वीज पडून दोन व्यक्ती जखमी, वाशिम जिल्ह्यात वीज पडून एक व्यक्ती व चार प्राणी मृत आणि एक व्यक्ती जखमी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात वीज पडून 17  प्राणी जखमी झाले आहेत. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहे. तर दिनांक 12 मार्च रोजी अहमदाबाद ते लंडन जाणाऱ्या एअर इंडियाच्या AI 171 या विमानच्या अपघातात राज्यातील दहा प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.