Liquor Price Hike : मद्यप्रेमींना झटका! सरकारच्या 'या' निर्णयामुळे मद्यपींची झिंग उतरली
मद्यप्रेमींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये देशी तसेच विदेश दारूच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. राज्य सरकारने यावर्षी देशी विदेशी दारूच्या दरात वाढ केली आहे. 180 ml देशी दारूच्या बाटलीची किंमत 80 रूपये झाली आहे. तसेच भारतीय बनावटीच्या दारूची किंमत 250 रूपयांवरून 360 रूपयांना झाली आहे. या किंमतींमध्ये 110 रूपयांची वाढ झाली आहे.
त्याचप्रमाणे हॉटेल-रेस्टॉरंटमध्ये विदेशी दारू विक्रीवर 15 ते 20 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. परिणामी या सर्वाचा दारूविक्रीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. सोलापूरमध्ये जुलै महिन्यात मद्यविक्री 13 हजार 734 लीटरने घटली.
हेही वाचा - CP Radhakrishnan Oath Ceremony : सी पी राधाकृष्णन यांनी घेतली उपराष्ट्रपतीपदाची शपथ
दरम्याने सोलापूर जिल्ह्यात खप घटलेला असतानाच राज्य शासनाकडून देशी आणि विदेशी दारूच्या दरात वाढ झाली आहे. तब्बल 80 ते 160 रूपयांपर्यंत वाढ केली आहे. याच कारणामुळे मद्यपींनी दारूच्या दुकानांकडे पाठ फिरवली आहे.
हेही वाचा - ITR फाइल करण्यास उरले फक्त तीन दिवस ; अन्यथा भरावा लागेल दंड
मागील वर्षी उत्पादन शुल्क विभागाला 260 कोटी रूपयांचे उद्दीष्ट दिले होते. त्यावेळी सरकारी तिजोरीमध्ये 385 कोटी रूपयांचा महसूल जमा झाला होता. मात्र यावर्षी दारूच्या दरात वाढ झाल्याने विक्रीत घट झाली आहे. त्यामुळे यावर्षीचं 510 कोटींचे लक्ष्य दिले आहे.