गोरेगाव नेस्को संकुलात ‘भव्य-दिव्य महाशिवरात्री’ महोत्सव – 3 हजार भाविकांकडून 5 कोटी गणेश मंत्र पठण!
संपूर्ण देशभरात महाशिवरात्रीचा उत्सव भक्तिभावाने साजरा होत असताना, मुंबईच्या गोरेगाव (पूर्व) येथील संकुलात भव्य आणि दिव्या महाशिवरात्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या पवित्र सोहळ्यात 3 हजारहून अधिक भाविकांनी एकत्र येऊन तब्ब्ल 5 कोटी गणेश मंत्राचे सामूहिक पठण केले, ज्यामुळे संपूर्ण वातावरण भक्तिरसाने भारावल.
या महोत्सवाचे प्रमुख मार्गदर्शक आचार्य उपेंद्र महाराज यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. विशेष म्हणजे, या सोहळ्यात महा यज्ञाचे आयोजन देखील करण्यात आले, ज्यामध्ये हजारो भक्तांनी सहभाग घेतला.
हेही वाचा : महाशिवरात्री उत्साहात! घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांचा महापूर
3 लाखांहून अधिक भाविकांनी घेतला लाभ नेस्को संकुलात झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यात संपूर्ण देशभरातून साधारण 3 लाख भक्तांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थित भक्तांसाठी तात्काळ उपचार सुविधा तसेच आध्यात्मिक अनुभूती मिळावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. आंतरयोग फाउंडेशनच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम विनामूल्य आयोजित करण्यात आला, त्यामुळे श्रद्धाळूंमध्ये विशेष आनंद आणि समाधान पाहायला मिळाले.
महाशिवरात्री निमित्ताने अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन होणे, ही भक्तांसाठी एक अद्वितीय संधी ठरली. “हर हर महादेव!” च्या जयघोषात हा पवित्र सोहळा भक्तिरसात संपन्न झाला.