Pune Water Cut: पुण्यात 'या' दिवशी मोठी पाणी कपात! शहराच्या अर्ध्याहून अधिक भागात पाणी पुरवठा बंद राहणार
Pune Water Cut: पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पुणे महानगरपालिकेने (PMC) 18 सप्टेंबर 2025 रोजी शहरातील अनेक भागात पाणी कपातीची घोषणा केली आहे. ही पाणी कपात जुन्या पंपिंग स्टेशन आणि जलकेंद्रांवरील दुरुस्ती व देखभालीच्या कामांसाठी होणार आहे. पार्वती, वडगाव, राजीव गांधी, खडकवासला जॅकवेल, वारजे फेज 1 व 2, एसएनडीटी, वारजे आणि नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे कामे होणार असल्याने या भागातील पुरवठा पूर्णपणे बंद राहील.
प्रभावित भाग
पार्वती एचएलआर टँक क्षेत्र - सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगर, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतामणीनगर, लेक टाऊन, अप्पर व लोअर इंदिरानगर, महेश सोसायटी, पार्वती गावठाण आदी.
वडगाव पाणी केंद्र क्षेत्र – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव, कात्रज, भारती विद्यापीठ क्षेत्र, येवलेवाडी, सहकारनगर भाग 2 इ.
राजीव गांधी पंपिंग क्षेत्र – संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक व खुर्द, वंडर सिटी, मोरेबाग, सुंदरबन सोसायटी, कात्रज गावठाण, भारत नगर इ.
वारजे व पॅनकार्ड क्लब टँक क्षेत्र – बावधन, भुसारी कॉलनी, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पॅनकार्ड रोड, मेडीपॉईंट रोड, इंगळेनगर, शाहूनगर, वारजे जकात नाका परिसर आदी.
एसएनडीटी (HLR) क्षेत्र – गोखलेनगर, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनी, कोथरूड संपूर्ण भाग, सेनापती बापट रोड, जनवाडी, भोसलेनगर, प्रभात रोड, अशोकनगर आदी.
पाषाण पंपिंग व सुस गोल टाकी परिसर – गणराज चौक, पॅनकार्ड रोड व वीरभद्रनगरचा काही भाग.
पाणीपुरवठा विभागानुसार, 19 सप्टेंबर रोजी सकाळी उशिरा पाणी येईल, परंतु हे पाणी कमी दाबाने सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांना आगाऊ तयारी करून पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने नागरिकांना आवाहन केले आहे की, या कालावधीत पाणी काळजीपूर्वक वापरावे आणि गैरसोय टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी.