29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही

Malegaon Blast Final Verdict: मालेगाव बॉम्ब स्फोटप्रकरणी मोठा निकाल, सर्व आरोपी निर्दोष

मालेगाव: 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव शहरात मोठा आणि कधीही न विसरणारा बॉम्ब स्फोट झाला होता. या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. तब्बल 17 वर्षांनंतर, पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. एनआयएच्या निकालामुळे हिंदुत्त्ववाद्यांना दिलासा मिळाला आहे. 

विशेष न्यायालयाने हा निकाल 17 वर्षे राखून ठेवला होता. याबाबतीत, गुरूवारी विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले होते. 29 सप्टेंबर 2008 रोजी, सायंकाळी मोठा स्फोट झाला होता. यात 101 जण जखमी झाले होते. न्यायालयाचा अंतिम निकाल असल्याने मालेगाव शहरात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

हेही वाचा: Nanded Crime News : नांदेड हादरलं; तरूणाने मुलीला भरदिवसा दुचाकीवर जबरदस्तीने उचलून नेले अन्...

17 वर्षांनंतर सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

साध्वी प्रज्ञा सिंह चंद्रपाल सिंह ठाकूर उर्फ स्वामी पूर्णचेतानंद गिरी, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित (निवृत्त), मेजर रमेश उपाध्याय (निवृत्त), समीर कुलकर्णी उर्फ चाणक्य समीर, अजय उर्फ राजा राहिरकर, सुधारावली पानवडेकर उर्फ राजा रहिरकर, दिवंगत पानसरे, दि. अमृतानंद देवतीर्थ आणि सुधाकर ओंकारनाथ चतुर्वेदी उर्फ चाणक्य सुधाकर, यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.

एनआयए कोर्टाचे न्यायाधीश काय म्हणाले?

निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले की, 'मालेगावमध्ये स्फोट झाल्याचे सरकारी वकिलांनी सिद्ध केले, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचे वय 101 नाही तर 95 वर्षे होते आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे'.

हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीसाठी आजचा दिवस खर्चीक; जाणून घ्या

2008 मध्ये नेमकं काय घडलं होतं?

29 सप्टेंबर 2008 रोजी अनेकजण रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात मग्न होते. या दरम्यान, रात्री 9:35 वाजल्याच्या सुमारास भिक्खू चौकातील एका हॉटेलजवळ मोठा बॉम्बस्फोट झाला होता. यात 6 जण ठार झाले आणि 101 जण जखमी झाले.  नाशिक जिल्ह्यातील मालेगावात हा प्रकार घडल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पसरले होते.