आंदोलन नियमात करा असे भुजबळांनी म्हटले. यावर आम्ह

Manoj Jarange: तुकडे मोडून भुकायचं काम करू नको, तुझ्यामुळे फडणवीस पुन्हा अडचणीत येईल; जरांगेंची भुजबळांवर जहरी टीका

नांदेड: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्टपासून मुंबईत आंदोलन करणार आहेत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा तरुण मुंबईला जाण्यावर ठाम आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरक्षण द्यावे, आम्ही मुंबईला येत नाही, आरक्षण जाहीर केले तर आम्ही मुंबईला जाणार नाही. उगाचच आम्ही कुणाला टार्गेट का करु अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली. यावर मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. आंदोलन जालन्यात कर, अंतरवाली सराटीत कर, मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर, त्याला कोण आडव येत आहे. पण आंदोलन नियमात करा असे भुजबळांनी म्हटले. यावर आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालू असल्याचा टोला जरांगेंनी भुजबळांना लगावला आहे. 

'आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालूय'

29 ऑगस्टला मुंबईला आंदोलन करण्यावर जरांगे ठाम आहेत. मात्र संविधानाने अधिकार दिलेत, नियमात आंदोलन कर असे भुजबळ म्हणाले आहेत. यावर छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. आम्हाला नियम शिकू नका, आमचं सगळं नियमात चालूय. मुंबईला आम्ही नियमात जाणार आहे. मराठी ओबीसीत जाणार, फडणवीस सरकारला न्यावं लागणार असं म्हणत मराठा आरक्षणावरुन मनोज जरांगे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. 

हेही वाचा: Chhagan Bhujbal: ओबीसीत शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही....; भुजबळांनी जरांगेंना सुनावलं

'तू नीट राहा दुसऱ्याला शहाणपण शिकू नको'

छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात जुंपलेली आपण नेहमीच बघत असतो. आता जरांगेंच्या आंदोलनावरही भुजबळ यांनी भाष्य केले. यावर बोलताना जरांगेंनी म्हणाले की तुला कोणी विचारलं का ? तू आम्हाला शिकवायची गरज आहे का ? आम्हाला लोकशाही, कायदा, संविधान तू शिकवायची गरज नाही. इतक्या नासक्या माणसाकडून आम्हाला नियम शिकवायची गरज नाही. जाती जातीत माणसं गुण्या गोविंदाने नांदत होते, सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्याने समाजा समाजात तेढ निर्माण केलं ते छगन भुजबळ आहे अशी जोरदार टीका जरांगेनी भुजबळांवर केली आहे. 

पुढे बोलताना, त्याच्यावर मी काही बोललो होतो का? त्याला काही बोलायची गरज का?. तू आम्हाला नियम शिकू नको. आमचं सगळं नियमात चालू आहे. मुंबईला आम्ही नियमात जाणार आहे. तू ओबीसीचा माणूस माणसात ठेवला नाही, याचा बाप तुझ्या डोक्यावर आहे. याचं तुला फळ भोगावं लागणार आहे. ओबीसीचा आणि मराठ्याचा खरा शत्रू असेल तर तो छगन भुजबळ आहे. ओबीसीतून आरक्षण घेतलंय म्हणतोय धक्का लागू देणार नाही, आमच्या हक्काचा आहे, नोंदी आहेत. उगच पागलसारखं करू नको, तुला मंत्री पद मिळालंय, तुकडे मोडून काय भुकायचं काम करू नको, तुझ्यामुळे देवेंद्र फडणवीस पुन्हा अडचणीत येईल. तिन्ही पक्षाची सत्ता तुझ्या एकट्यामुळे अडचणीत येईल, तू नीट राहा दुसऱ्याला शहाणपण शिकू नको" असे जरांगेंनी म्हटले आहे. 

जरांगे भुजबळांवर भडकल्याचे पाहायला मिळत आहे. त्याला काही डोकं आहे की नाही त्याला अजितदादने कशाला मंत्री केलं कळत नाही. मराठी ओबीसीत जाणार आहेत, फडणवीस सरकारला न्यावं लागणार आहे. त्याच्या भूकण्याने काहीच होत नाही छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस आहे. तू आम्हाला नियम शिकू नको, आमचं सगळं नियमात चालू आहे. मुंबईला आम्ही नियमात जाणार आहे अशी जहरी टीका जरांगेंनी भुजबळांवर केली आहे.