अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 2:31 च्या सुमारास,

Mumbai ED Office Fire: मुंबईतील ईडी कार्यालयाला भीषण आग

Mumbai ED Office Fire

मुंबई: दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील ईडी कार्यालयाच्या इमारतीत रविवारी पहाटे भीषण आग लागली. या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अग्निशमन दलाला पहाटे 2:30 वाजता आगीची माहिती मिळाली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 2:31 च्या सुमारास, अग्निशमन दलाला करिमभॉय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कार्यालय असलेल्या बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली.

अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने पुष्टी केली की, पहाटे 3:30 वाजता आग लेव्हल-2 घोषीत करण्यात आली, जी सामान्यतः मोठी आग मानली जाते.

हेही वाचा - शेती महामंडळाच्या 22 हजार कर्मचाऱ्यांना म्हाडाकडून घरे मिळणार

चौथ्या मजल्यावर आग - 

महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत ठाकर समाजाचे नेते मारुती मेंघाळ शिवसेनेत पक्षप्रवेश

आगीचे कारण अस्पष्ट - 

दरम्यान, घटनास्थळी आठ अग्निशमन दलाच्या गाड्या, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि 108 सेवेतील एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. तथापि, ही आग कशी लागली? याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.