Maharashtra Weather Update: महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना हवामान खात्याने दिला यलो अलर्ट
मुंबई: मागील महिन्यात अवकाळी पावसाने राज्यभरात जोरदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे पुन्हा एकदा उष्णता वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, हवामान खात्याने असा इशारा दिला आहे की, 'राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे'. यासह, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच, राज्यातील काही जिल्ह्यांच्या तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे.
पुढील तीन दिवसात राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत वादळी वारा, हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच, हवामान खात्याने राज्यातील काही जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाचे आगमन झाले आहे.
हेही वाचा: 'युतीबाबत दोन्ही भावांनी फोनवरून चर्चा करावी'; पुतण्याचा काकांना सल्ला
राज्यातील 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी:
हवामान खात्याने महाराष्ट्रातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड इत्यादी जिल्ह्यांत यलो अलर्ट जारी केला आहे.