मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून बंद राहणार असून, प्र

Monorail Temporarily Suspended: MMRDA चा मोठा निर्णय! मुंबई मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून तात्पुरती स्थगित

Monorail Temporarily Suspended: मुंबईतील मोनोरेल सेवा तात्पुरती स्थगित केली जाणार आहे. चेंबूर ते सात रस्ता या मार्गावर धावणाऱ्या मोनोरेल सेवेत नुकत्याच घडलेल्या अपघातांमुळे आणि तांत्रिक सुधारणा करण्यासाठी एमएमआरडीएने हा मोठा निर्णय घेतला आहे. मोनोरेल सेवा 20 सप्टेंबरपासून बंद राहणार असून, प्रवाशांना काही महिन्यांसाठी सेवा उपलब्ध होणार नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे की, बंदी कालावधीत मोनोरेलच्या तांत्रिक प्रणालीचे अपग्रेडेशन, सुरक्षा तपासण्या आणि आधुनिकीकरणाच्या कामावर लक्ष दिले जाईल. सध्या चालू असलेली सेवा सकाळी 6:15 वाजता सुरू होऊन रात्री 11:30 वाजता संपते. केवळ 3.5 तासांची रात्रीची विश्रांती मोनोरेल सुधारण्यासाठी पुरेशी नाही. नवीन रेक्स, सिग्नलिंग प्रणाली, जुने रेक्स दुरुस्त करणे, तसेच सुरक्षिततेसाठी पॉवर डिस्चार्ज आणि रिचार्ज करणे यासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याने सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हेही वाचा - Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस; 6 आठवड्यांत द्यावे लागणार उत्तर

सुधारणांमध्ये प्रमुख बाबी - 

नवीन ‘रोलिंग स्टॉक’ आणि प्रगत CBTC (Communication-Based Train Control) सिग्नलिंग प्रणाली बसवणे. 5 इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग-32 ठिकाणी बसवण्यात आले असून चाचण्या सुरू. वे साइड सिग्नलिंग पूर्ण, एकात्मिक चाचणी सुरु.

हेही वाचा Buldhana Accident : बुलढाण्यात कार-ट्रेलरची भीषण धडक; चौघांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

दरम्यान, मोनोरेलचे 8 रेक्स मुंबईत पोहोचले असून 9 वा रेक तपासणीसाठी तयार आहे. तसेच 10 वा रेक तयार करण्याच्या प्रक्रियेत आहे. मोनोरेलच्या एका गाडीची क्षमता 562 प्रवासी आहे. मोनोरेलच्या संपूर्ण प्रकल्पावर 2460 कोटी रुपये खर्च झाला आहे. मोनोरेलची सुरक्षात्मक सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी घेतलेली ही पावले, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची असून, सेवा पुन्हा सुरू होण्याची तारीख अद्याप निश्चित नाही.