मुंबईत सणासुदीचा हंगाम सुरु होताच मुंबई पोलिसांनी

Sharadiya Navratri 2025: मुंबईत नवरात्रोत्सव शांत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलीस सज्ज

Sharadiya Navratri 2025: मुंबईत सणासुदीचा हंगाम सुरु होताच मुंबई पोलिसांनी नवरात्रोत्सवासाठी पूर्णपणे सुरक्षा बंदोबस्त सुरू केला आहे. देवीच्या मंडपातील भाविकांची सुरक्षितता, गर्दी व्यवस्थापन आणि कोणत्याही अनुचित घटनेची टाळणी यावर पोलिसांचे विशेष लक्ष आहे.

नवरात्रोत्सवाचा कालावधी नऊ दिवसांचा असतो आणि यावेळी मुंबईत गरबा, दांडिया आणि देवीच्या मंडपांभोवती मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात. या पार्श्वभूमीवर प्रत्येक पोलिस ठाण्याचे अधिकारी त्यांच्या हद्दीतल्या मंडळांशी, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नेत्यांशी बैठक घेऊन कायद्याचे पालन आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी सहकार्य मागत आहेत.

पोलिसांनी सर्व मंडळांना सुरक्षा मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. त्यात स्वयंसेवकांची योग्य नेमणूक करणे, उपस्थितांचे नोंद ठेवणे, गरब्याच्या ठिकाणी अनावश्यक साहित्य आणू नये, वाहने पार्किंगसाठी ठिकाणी ठेवू नये, वॉच टॉवर्स उभारणे, सीसीटीव्ही लावणे, तसेच खासगी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करणे यांचा समावेश आहे. यामुळे कोणत्याही प्रकारच्या चोरी, छेडछाड किंवा अनुचित घटनेचा संभव कमी होईल. हेही वाचा: Sharadiya Navratri 2025: अखंड दीप लावताय? नवरात्रोत्सवात दिवा प्रज्वलित करण्यापूर्वी ‘हे' नियम जाणून घ्या; अन्यथा...

मुंबईच्या महालक्ष्मी आणि मुंबादेवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. याठिकाणी भाविकांची गर्दी खूप जास्त असते आणि त्यामुळे विशेष पोलिस बंदोबस्त ठेवला जाणार आहे. रात्रीच्या वेळीही कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची सतत गस्त असणार आहे.

सध्याच्या काळात सायबर माध्यमांवर देखील खळबळ सुरू असते. त्यामुळे समाजमाध्यमांवर लक्ष ठेवण्यास पोलिस सज्ज आहेत. धार्मिक भावना दुखावतील किंवा समाजात तणाव निर्माण होईल अशा पोस्ट टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सायबर पोलिस उत्सव काळात विशेष सक्रिय राहणार आहेत.

पोलिसांनी विशेष करुन महिलांच्या व मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले आहे. गरबा आणि दांडिया ठिकाणी उपद्रवी घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेशात गस्त घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संवेदनशील भागात कोम्बिंग ऑपरेशन आणि रात्रीची गस्त करत कायद्याचे उल्लंघन होऊ नये याची खबरदारी घेतली आहे. हेही वाचा:Sharadiya Navratri 2025: घटस्थापना करताना 'या' वस्तू अजिबात विसरू नका, अन्यथा पूजा अपूर्ण राहील; संपूर्ण यादी येथे तपासा

नवरात्रोत्सव शांत आणि आनंदात पार पडावा यासाठी आयोजकांना परवानगी दिलेल्या वेळेत कार्यक्रम संपवणे, ध्वनिप्रदूषण टाळणे, नियमांचे पालन करणे आणि सुरक्षेबाबतच्या सर्व सूचना काटेकोरपणे पाळणे गरजेचे आहे.

एकूणच, मुंबई पोलिसांचा हा सज्ज बिंदास बंदोबस्त नवरात्रोत्सव अधिक सुरक्षित आणि सुखकर करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल, तसेच नागरिकांनीही सुरक्षा नियमांचे पालन करून सणाचा आनंद सुरक्षित वातावरणात साजरा करावा.