मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वा

नागपूर विमानतळ प्रशासनाला धमकीचा मेल; शोध मोहीम सुरू

नागपूर: मंगळवारी पहाटे साडेसहा वाजल्याच्या सुमारास मेलद्वारे नागपूर विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरल्या. हा मेल भारतीय विमान प्राधिकरणाच्या मेलवर आल्याने सर्वत्र भितीचे वातावरण पाहायला मिळाले. तसेच, या घटनेची माहिती मिळताच, पहाटे शिघ्र प्रतिसाद दलासह बॉम्ब शोध आणि नष्ट पथक आणि श्वान पथकाला तातडीने देखरेख विमानतळावर पाचारण करण्यात आले.

या घटनेबाबत बोलताना, पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी ऋषिकेश रेड्डी म्हणाले की, 'जेव्हा आम्हाला या घटनेची माहिती मिळाली तेव्हा, पहाटेच्या सुमारास सोनेगाव पोलीस ठाण्यातील 40 पोलिसांची टीम, पोलीस आयुक्तालयातील बॉम्ब शोध आणि नष्ट पथकातील 8 जवान, शिघ्र प्रतिसाद दलाची टीम, 1 स्निफर श्वान चार पोलिस जवान यासह, विमानतळावर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना विमानतळावर पाचारण करण्यात आले. धमकी देणाऱ्या मेलमुळे विमानतळावर सुरक्षा व्यवस्था देखील तैनात करण्यात आले. मागील वर्षी, 29 एप्रिल, 18 जून आणि 24 जूनदरम्यान नागपूर विमानतळाला तीन वेळा बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली होती, तीही मेलद्वारे'.

'नागपूर विमानतळाला धमकीचे मेल एक माथेफिरू डार्क वेब एक्सेस टॉर कम्युनिकेशन ब्राऊजर वापरत आहे. सध्या, आम्ही त्याच्या ठिकाणाचे शोध घेत आहोत. तीन महिन्यांपूर्वी देखील याच व्यक्तीने नागपूर आणि छत्रपती संभाटी खंडपीठालाही धमकीचा मेल आला होता. इतकंच नाही, तर त्याने तामिळनाडूतही धमकी देणारे 50 मेल पाठवले होते. यासह, कर्नाटक, तमिळनाडू पोलिस आणि केंद्रिय गुप्तचर शाखेचे पथकही त्याला पकडण्याच्या मार्गावर आहेत', अशी माहिती पोलीस उपायुक्त सिंगारेड्डी ऋषिकेश रेड्डी यांनी दिली.