Nagpur: वसतिगृहात घुसून मुलीचा विनयभंग; 64 मुलींमध्ये भीतीचे वातावरण
नागपूर: नागपूरात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मंगळवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास सरकारी ओबीसी मुलींच्या वसतिगृहात दोन आरोपी घुसले. या दरम्यान, आरोपींनी एका मुलीच्या रूममध्ये घुसून तिचा विनयभंग केला. इतकच नाही, तर या आरोपींनी तिचा फोन चोरला आणि फरार झाले. या घटनेमुळे वसतिगृहात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा: कोकाटेंची उचलबांगडी? कृषी विभाग मकरंद पाटलांना मिळणार
हा प्रकार नागपूरातील एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत घडला असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथके रवाना करण्यात आली असून लवकरात लवकर आरोपींना शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुर्दैव म्हणजे, मुलींच्या सुरक्षिततेसाठी या वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमेरे नाही, मुलींच्या दरवाज्याला कुंडी नाही, वसतीगृहात अपेक्षित सुरक्षा रक्षक देखील नाही. तक्रारीनुसार, पोलिसांनी वसतिगृह परिसरात काही संशयितांचा शोध सुरू केला आहे. यासह, वसतिगृहातील कर्मचारी आणि इतर रहिवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत. पोलिसांनी आश्वासन दिले की, 'आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल'.