Praful Lodha: हनीट्रॅप प्रकरणात नाव, प्रफुल्ल लोढा पुन्हा गोत्यात, महिलेच्या तक्रारीवरून पुण्यात गुन्हा दाखल
पुणे: प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील कोथरुडमध्ये राहणाऱ्या 36 वर्षीय महिलेने लोढा यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लोढावर बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी हनी ट्रॅप प्रकरण समोर आले आहे. याच प्रकरणात लोढावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच रविवारी लोढा याच्याविरोधात मुंबईत पोक्सो बलात्कारासह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नाशिकमधील बहुचर्चित हनी ट्रॅप प्रकरणात 72 अधिकारी आणि नेते अडकल्याची चर्चा सुरू असताना हनी ट्रॅप प्रकरणाची पाळमुळं जळगावपर्यंत पोहोचलेले आहेत. हनी ट्रॅप प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील प्रफुल्ल लोढाविरोधात मुंबईत पोक्सो बलात्कारासह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे दाखल असून प्रफुल्ल लोढाला अटक देखील करण्यात आली आहे. प्रफुल्ल लोढा याला अटक झाल्यानंतर मुंबई पोलिसांकडून जळगाव, जामनेर आणि पहूर या ठिकाणी प्रफुल्ल लोढा याच्या मालमत्तेवर पोलिसांनी छापेमारी केली असून तपासणी दरम्यान लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिवाइस पोलिसांनी जप्त केली आहेत. यातच आता लोढावर कोथरुडमध्येही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: अजित पवारांनी कान उपटले; पत्रकार परिषदेत माणिकराव कोकाटे कुणावर बरसणार ?
लोढाविरोधात पुण्यात आणखी एक गुन्हा प्रफुल्ल लोढा हनी ट्रॅप प्रकरणात अडकल्याची चर्चा आहे. त्याच्याविरोधात मुंबईमध्ये पोक्सो बलात्कारासह हनी ट्रॅप प्रकरणात दोन गुन्हे करण्यात आले. त्यानंतर लोढाला अटक झाली आणि आता 36 वर्षीय महिलेने त्याच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला आहे. यामुळे प्रफुल्ल लोढा या प्रकरणात पुरता अडकल्याचे पाहायला मिळत आहे.
कोण आहे प्रफुल्ल लोढा? प्रफुल्ल लोढा भाजपाचा माजी पदाधिकारी आहे. मंत्री गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय आहे. मंत्री महाजनांवर लोढाने गंभीर आरोप केले. त्यानंतर लोढाने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. वंचित बहुजन आघाडीसोबतही काम केलं आहे. सामाजिक कार्यकर्ता, उद्योजक अशी प्रफुल्ल लोढाची ओळख आहे.