पैशांच्या मोहाने अंध आणि सरकारी नोकरी जाईल या भीती

सरकारी नोकरीच्या हव्यासापोटी नराधम बापाने विकली स्वतःची मुलगी

नांदेड: पैशांच्या मोहाने अंध आणि सरकारी नोकरी जाईल या भीतीने एका बापाने चक्क लाखो रुपये देऊन स्वतःच्या मुलीला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नांदेडमधील भाग्यनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी मुलीच्या वडिलांविरोधात कारवाई केली आहे.

हेही वाचा: Today's Horoscope: 'या' राशीसाठी धनप्राप्तीचे योग; आर्थिक बाजू होणार बळकट

माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीचे वडील हिंगोली येथील महसूल विभागाच्या दुय्यम निबंध कार्यालयात अनुकंपावर गेल्यावर शिपाई म्हणून भरती झाले होते. पहिला त्यांना मुलगा झाला होता. यानंतर, त्यांना दोन जुळ्या मुली झाल्या. अशातच, जुळ्या मुलींपैकी एका मुलीला 1 लाख रुपये देऊन विकल्याने पीडित मुलीच्या आईने भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच, अल्पवयीन मुलीने केलेल्या तक्रारीनंतर तब्बल 8 वर्षांनी स्वतःच्या मुलीला विकणाऱ्या नराधम बापाविरोधात आणि तिला विकत घेणाऱ्या पुजारीविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, पोलिसांनी आठ वर्षांच्या मुलीला पुजाऱ्याकडून ताब्यात घेतले आहे आणि पीडित मुलीला एका सेवाभावी संस्थेत ठेवले आहे. 'माझी मुलगी मला परत देण्यात यावी', अशी मागणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे केली आहे.

मागील आठ वर्षांपासून अल्पवयीन मुलीचे आरोपी वडील आणि तिची आई वेगळे राहत आहेत. गेल्या वर्षी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना अनुकंपाखाली शिपाई म्हणून नोकरी लागल्याने हे प्रकरण उघडकीस झाले आहे. नोकरी जाईल या भीतीपोटी नराधम बापाने आपल्या पोटच्या विकल्यामुळे वडिलांविरोधात तसेच, तिला विकत घेणाऱ्या पुजाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांवर लवकरच कारवाई केली जाईल, असे म्हटले जात आहे.