नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे
गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव
१७ सप्टेंबर, २०२४, नाशिक : नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्याचे आयोजन करण्यात आले. या शिवतांडव नृत्याने गणेश भक्तांचे लक्ष वेधले.
या नृत्याने नाशिकचा विसर्जन मिरवणूक मार्ग गजबजला होता. हरियाणाच्या कलाकारांनी हे तांडवनृत्य केले.
विसर्जन मिरवणुकीत शंकरासह महाबली हनुमानाचे अनोखे नृत्य सादर करण्यात आले. हा एकूणच सोहळा पहाण्यासाठी नाशिककरांनी मोठी गर्दी केली होती. दरवर्षी वेगवेगळ्या आकर्षक नृत्याची मेजवानी शिवसेना युवक मित्र मंडळाकडून आयोजित केली जाते.