भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज

पावसात छत्री घेऊन 'किसी के हात ना आयेगी ये लडकी' गाण्यावर नवनीत राणांचा हटके अंदाज समोर

अमरावती: भाजपाच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज समोर आला आहे. पावसात बॉलिवूड गाण्यावर त्यांनी डान्स  केला आहे. नवनीत यांचा पावसातील डान्स व्हायरल होताना दिसत आहे.  'किसी के हात ना आयेगी ये लडकी' या गाण्यावर त्यांनी डान्स केला आहे. 

अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा हटके अंदाज समोर आला आहे. नवनीत राणा डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घालून छत्री घेऊन पावसात नाचताना नवनीत राणा यांनी बॉलिवूडच्या गाण्यावर रील शूट केला आहे. राणांचा रील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.

हेही वाचा: अजित पवारांनी शब्द पाळावा; छावा संघटनेचा थेट इशारा

नवनीत राणांचा हटके अंदाज अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांचा एक डान्स करतानाचा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या रीलवर सोशल मीडियावर  प्रचंड धुमाकूळ घातला आहे. या व्हिडिओमध्ये नवनीत राणा यांनी गुलाबी कलरचा पंजाबी ड्रेस घातला आहे. तसेच पांढरी छत्री घेऊन 'किसी के हात ना आयेगी ये लडकी' या गाण्यावर डान्स केला आहे. सोशल मीडियावर त्यांच्या या रील व्हिडीओला प्रचंड प्रतिसाद तर मिळत आहेच पण अनेकांच्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. लाखो लोकांनी हा व्हिडिओ काही वेळातच बघितला आहे. नवनीत राणा स्वतः अभिनेत्री असल्याने हुबेहूब चालबाज चित्रपटातील गाण्यावर अभिनेत्री श्रीदेवी यांच्या सारखंच नृत्य त्यांनी केलं आहे.