न्यूड व्हिडिओ कॉलमुळे 60 वर्षीय सेवानिवृत्त शिक्ष

व्हिडिओ कॉल उचलला अन् सुरु झाला न्यूड ब्लॅकमेलचा खेळ, सेवानिवृत्त शिक्षकाची 14 लाखांची फसवणूक

छत्रपती संभाजीनगर: सायबर गुन्हेगारीचे प्रकार दिवसेंदिवस अधिक धोकादायक होत चालले आहेत. सध्या सोशल मिडियाचा गैरवापर करून सामान्य नागरिकांना जाळ्यात ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. संभाजीनगरातील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एका न्यूड व्हिडिओ कॉलमुळे 60 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाची तब्बल 14 लाख रुपयांची फसवणूक झाली.

पीडित शिक्षकाला व्हॉट्सॲपवर अचानक एका अनोळखी नंबरवरून व्हिडिओ कॉल आला. कॉल उघडल्यानंतर 20 सेकंद व्हिडिओ कॉल सुरु होता आणि ह्याच कॉलच्या आधारे ब्लॅकमेलिंग सुरू झाली.न्यूड व्हिडिओ कॉल करत तो व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली.  'हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करू,' अशी धमकी दिल्यानंतर, तोतया पोलिसांनीही फोन करून ‘तुमच्यावर गुन्हा दाखल होणार आहे’ असं सांगत जेलमध्ये टाकण्याची भीती दाखवली.

हेही वाचा: छत्रपती संभाजीनगरात टँकरसाठी दोन दिवसांची प्रतीक्षा, दरात तिप्पट वाढ

या धक्कादायक प्रकारामुळे घाबरलेल्या शिक्षकाने आरोपी सांगतील त्या विविध खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर केली. मोनी पाटील, हेमंत मल्होत्रा, प्रमोद राठोड, अरविंदसिंग आणि दोन अज्ञात आरोपींविरुद्ध पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.