सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्र

आंतरजातीय विवाह केल्याने नर्स सासूने घरीच केला सुनेचा गर्भपात

नाशिक: पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच राज्यभरातून अनेक धक्कादायक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. अशातच, महिला अत्याचाराच्या घटना सुरू असतानाच नाशिकमधून पुन्हा एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सात वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केला होता. मात्र आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू, सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती. पती देखील लग्न होऊनही खालच्या जातीचा असल्याने घरचे विरोध करत होते आणि त्या महिलेला नांदवण्यास तयार नव्हते. मात्र, पीडित महिला गर्भवती असल्यामुळे नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केला असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, नणंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

2017 पासून पीडित महिला आणि भूपेश पाठक एकमेकांना ओळखत होते. इतकंच नाही, तर हे दोघे एकाच महाविद्यालयात शिकत होते. तेव्हा या दोघांमध्ये मैत्री झाली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. 2021 मध्ये पीडित आणि भूपेशमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर ती महिला गर्भवती झाली. भूपेशने गोळ्या देऊन महिलेचा गर्भपात केला. त्यानंतर ती महिला लग्नासाठी भूपेशच्या मागे लागली. यामुळे भूपेशने 2023 मध्ये वैदिक विधीनुसार अशोक स्तंभ येथे त्या महिलेशी लग्न केले. या लग्नाबद्दलची माहिती एका मित्राशिवाय कोणालाही नव्हती. पीडित महिला आणि भूपेश पाठक या दोघांचे लग्न होऊनही ते आपापल्या घरी राहत होते.

लग्नानंतर दोघांनी पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि पीडित पुन्हा गर्भवती झाली. भूपेशच्या कुटुंबीयांना ही गोष्ट समजली. लग्न झाल्यानंतरही, ही महिला फक्त सण आणि कार्यक्रमांनाच तिच्या सासरच्यांना भेटायची. जेव्हा ती तिथे जायची तेव्हा तिचे सासू, सासरे आणि मेहुणी तिच्यावर अत्याचार करत तिला शिवीगाळ द्यायचे. 'तू खालच्या जातीची आहेस', असे म्हणत तिला टोमणे मारायचे. इतकंच नाही, तर पती भूपेशने तिला म्हणाला की, 'आपण सगळ्यांसमोर लग्न करू. पण लग्नाच्या वेळी तू गर्भवती असशील, तर चांगले वाटणार नाही. तू आधी गर्भपात करून घे'. अशातच, या पीडित महिलेची सासूने तिला घरी बोलवून गर्भपाताच्या तीन गोळ्या दिल्या आणि सलाईनही लावले. यानंतर सासरच्यांनी पीडितेला तिच्या घरी पाठवले. मात्र दुर्दैव असा की गर्भपात झाल्यानंतर पती भूपेश काही केल्या या महिलेला त्याच्या घरी नांदवायला तयार नव्हता. त्यामुळे पीडितेने नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देऊन पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, नणंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

'तू झोपडपट्टीत राहतेस...':

जेव्हा भूपेशने त्या पीडितेचा दुसऱ्यांदा गर्भपात केला, त्यानंतर त्याने पीडितेला घरी नांदवण्यास तयार नव्हता. जरी ही महिला दाराशी बसली होती तरी तिला घरात प्रवेश दिला जात नव्हता. इतकंच नाही तर भूपेशने पीडितेला म्हणाला की, 'तू खालच्या जातीची आहेस', 'झोपडपट्टीत राहणारी आहेस', 'तुझी आर्थिक परिस्थितीही चांगली नाही', 'माझ्या घरचे आपलं लग्न मान्य करणार नाहीत'. महिला घरी परतल्यानंतर तिचे सासरेआणि मेहुणी तिला जातीवाचक शिवीगाळ करायचे. या चौघांनाही पोलिसांनी अटक करून त्यांना पोलिस कोठडीत पाठवले आहे.