विद्यार्थ्यांच्या बॅगेत सापडले आक्षेपार्ह साहित्य; शिक्षकांनी घेतली कठोर भूमिका
नाशिक : सध्या मोबाईलच्या आहारी जाऊन मुले नको त्या गोष्टी करतात. असाच एक प्रकार समोर आला आहे. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य आढळले आहे. त्यामुळे शिक्षकांनी कठोर भूमिका घेतली आहे.
नाशिमकध्ये विद्यार्थ्यांच्या बॅगेत चाकू, सायकलची चेन, लोखंडी कडे, कंडोमची पाकिट (निरोधक) व तंबाखू जन्य पदार्थ आढळले. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. नववीच्या पाच ते सहा विद्यार्थांच्या बॅगमध्ये आक्षेपार्ह साहित्य सापडले आहे. यामुळे शाळेतील शिक्षकांची कठोर भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत आहे. या प्रकारानंतर फॅशनेबल हेअरस्टाईल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस कापले आहेत.
विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य आढळून आलं ही चिंतेची बाब आहे. शिक्षण विभागाकडून यासंदर्भात सकारात्मक पावलं उचलली जातील. विद्यार्थ्यांना शिस्त लावणं ही शिक्षकांबरोबरच पालकांची देखील जबाबदारी आहे. शिक्षकांनी अध्यापनासोबतच विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी दप्तर तपासले. त्यांचं अभिनंदन आहे. अन्य शाळांमध्येही शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे दप्तर तपासावेत. पालकांनी देखील घरी विद्यार्थ्यांशी बोलायला हवं, त्यांचं दप्तर तपासायला हवं.