Parrot Viral Video : पोपटालाही मोबाईलची क्रेझ, कोणी हात लावल तर थेट अटॅक करतो; व्हिडीओ एकदा पाहाच
गोंदिया: आजकाल मोबाईलशिवाय माणसाचा दिवस सुद्धा सुरु होत नाही. प्रत्येकाला मोबाईल हवाच असतो. पण आता प्राण्यांनाही मोबाईलचे वेड लागले आहे. समाज माध्यमांमध्ये एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये एक पोपट मोबाईल ऑपरेट करत आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये एक पोपट मोबईल वापरताना दिसत आहे. पोपट आपल्या चोचीने मोबाईलवर गाणी लावत आहे आणि गाणं लागल्यावर शांतपणे ऐकत आहे. चोच मोबाईलवर आपटत तो मोबाईल वापरत आहे.
दरम्यान मोबाईल वापरताना जर कोणी त्यात व्यत्यय आणला किंवा त्याच्याकडून मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला तर पोपट त्याला चावायला जातो. पोपट मोबाईलजवळ कोणाला फिरकायला सुद्धा देत नाही. गोंदियातील जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील शिरपूर गावातील एका घरातील हा पोपट आहे. विजय रातपूत यांचा हा पोपट आहे. जो मोबाईलच्या प्रेमात पडला आहे. तो स्वत: मोबाईल वापरताना दिसत आहे.