मंगळवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले

'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाविरुद्ध लोकांचा रोष भडकला...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

CM Devendra Fadnavis On Nagpur Violence

CM Devendra Fadnavis On Nagpur Violence: नागपूरमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराला 'पूर्वनियोजित कट' म्हटले असून त्यांनी छावा चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर लोकांच्या भावनांशी अशांततेचा संबंध जोडला आहे. मंगळवारी विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 'छावा चित्रपटामुळे औरंगजेबाच्या विरोधात लोकांचा रोष निर्माण झाला आहे, परंतु असे असूनही, महाराष्ट्र शांत राहील याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. तथापि, यावेळी मुख्यमंत्र्यांनी  पोलिस कर्मचाऱ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा - ‘औरंगजेब कुठे, देवेंद्र फडणवीस कुठे?’हर्षवर्धन सपकाळांचे डोळे काढले की जीभ छाटली - एकनाथ शिंदेंचा हर्षवर्धन सपकाळांवर घणाघात

हा सुनियोजित हल्ला - 

दरम्यान, विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाने नागपुरात निदर्शने आयोजित केली होती, जी चुकीच्या माहितीमुळे उधळली गेली. धार्मिक वस्तूंची विटंबना झाल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. हा एक सुनियोजित हल्ला असल्याचा दावा फडणवीस यांनी केली आहे. सुमारे 80 जणांचा जमाव दगडफेकीत सहभागी होता, ज्यांनी जाणूनबुजून पोलिस अधिकाऱ्यांना लक्ष्य केले. एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. तसेच तीन उपायुक्तांवर हल्ला करण्यात आला. अनेक घरांना लक्ष्य करण्यात आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. 

हेही वाचा - Eknath Shinde on Nagpur Violence: 'हा एक सुनियोजित कट आहे'; नागपूर हिंसाचारावर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

खोट्या अफवांनी घातलं हिंसाचार खतपाणी - 

तथापि, नागपूर शहरात तणाव वाढविण्यात खोट्या अफवांनी कशी मोठी भूमिका बजावली यावर फडणवीस यांनी भर दिला. त्यांनी सांगितलं की, आधी कबरीच्या पत्र्यावरील धार्मिक चिन्हाची विटंबना करण्यात आल्याच्या अफवा पसरवण्यात आल्या. त्यामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळालं. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाच फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत आणि 11 पोलिस ठाण्यांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. याव्यतिरिक्त, राज्य राखीव पोलिस दलाच्या (एसआरपीएफ) पाच तुकड्या तैनात करण्यात आल्याची माहिती देखील, मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.