पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत एक्स्प्रेसना
पंतप्रधान तीन वंदे भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखवणार
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यावेळी पंतप्रधान नागपुरातील अजनी ते पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचं होणार लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. आज मोदी अजनी ते पुणे, बंगळुरू-बेळगाव आणि कटरा-अमृतसरमार्ग अशा तीन वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
हेही वाचा: Today's Horoscope: आज काही राशींच्या जीवनात अडचणी येऊ शकतात, जाणून घ्या...
नागपुरातील अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेसला आज मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे. अजनी ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस ही आतापर्यंतची सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन आहे. ती 881 किमी अंतर कापणार आहे. आगामी 3 वर्षांत भारतीय रेल्वे 200 पेक्षा अधिक वंदे भारत ट्रेन सुरू करण्याचा मानस ठेवत आहे.