पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकव

पुण्यात पोलीस कमजोर, टवाळके शिरजोर?

रोहन कदम, प्रतिनिधी, पुणे: पुण्यात गुन्हेगारी थांबण्याचं नाव घेत नाहीये. धनकवडीत काल रात्री गाड्यांची तोडफोड करत टोळक्यांने दहशत निर्माण केला. यामुळे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. गुन्हे करून आरोपी मात्र मोकाट आहेत. यामुळे पुणे पोलिस काय करतात असा प्रश्न निर्माण होतोय.

मागील काही दिवसांपासून पुणे शहरात विविध भागांत टोळक्यांकडून धुडगूस घालण्याच्या घटना समोर येत असतानाच   धनकवडीमध्ये गाड्यांची तोडफोड करत दहशत माजवली. यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. महिला सुरक्षित नाहीत. त्यामुळे भीतीचं वातावरण आहे. पोलीस पेट्रोलिंग करत नाहीत असा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. पोलीस भरती वाढावी अशी मागणी केली जात आहे.

पुण्यात गेली काही दिवसांपासून भवानी पेठ आणि रामटेकडी, कोंढवा या घटना ताजा असताना धनकवडी भागातही रात्री धुडगूस पाहायला मिळाला. त्यामुळे पोलिसांसमोर कायदा-सुव्यवस्थेचे आव्हान उभे आहे.

हेही वाचा: अमरावतीत बच्चू कडू उतरले रस्त्यावर; प्रहार संघटनेकडून भररस्त्यात चक्काजाम आंदोलन

पुण्यात गेले काही दिवसात टोळक्याने घातलेले राडे

28 जून: चतुः शृंगी पोलिसांच्या हद्दीत विधाते वस्ती येथे 15 जणांचा धुडगूस.

28 जून : सिंहगड रस्त्यावर माणिकबाग येथे चौघांनी राडा घालून 15 वाहनांची तोडफोड केली.

3 जुलै : पूना कॉलेज येथे निकाल पाहण्यासाठी गर्दी झाल्यानंतर किरकोळ कारणावरून 10 ते 15 जणांनी राडा घालून, एका तरुणाला धारदार हत्याराने मारहाण केली.

5 जुलै : वानवडीत मध्यरात्री दोन गट भिडले. दारूच्या बाटल्यांनी एकमेकांना मारहाण केली.

12 जुलै : कात्रज-कोंढवा रस्त्यावर सात ते आठ जणांच्या टोळक्याने दुचाकीवरून येऊन हातात कोयते आणि तलवारी घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. एका तरुणावर हल्लाही केला.

20 जुलै : भवानी पेठ आणि कोंढवा येथे टोळक्याचा राडा.

23 जुलै : धनकवडी परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी गाड्यांची तोडफोड

यामध्ये रोहित पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहखात झेपत नसेल तर त्यांचं खात इतरांना द्यावे आणि ही गुन्हेगारी कमी करावी अशी मागणी केली. मुख्यमंत्री पुण्यात ज्या ज्या वेळेस आले. ते फक्त राजकीय कार्यक्रमासाठी आलेले आहेत. 

नेमक्या का वाढतायेत घटना ? या सगळ्या घटना जर पाहिल्या तर विशेषतः यामध्ये तरुण किंवा अल्पवयीन आरोपी असल्याचे समोर येतं तसेच साधारणतः मध्यरात्रीच्या सुमारास अशा प्रकारच्या तोडफोडीच्या घटना किंवा कोयत्याने हल्ला करण्याच्या घटना घडताना पाहायला मिळतात. दहशत माजवणे हा मुख्य उद्देश असला तरी देखील अनेकदा मध्यरात्री अशा घटना घडत असल्यामुळे दारूच्या नशेमध्ये हे गुंड असतात. तसेच गांजासारख्या अमली पदार्थांचे सेवन देखील यांच्याकडून केली जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येते आहे आणि याच नशेमध्ये अशा घटना केल्या जातात.

हेही वाचा: अल कायदाचे चार अतिरेकी अटकेत; गुजरात पोलिसांची धडक कारवाई

कोम्बिंग ऑपरेशन केवळ नावालाच? वाढत्या घटनांना पाहून पुणे पोलिसांनी मागील काही दिवसांपूर्वी कोम्बिंग ऑपरेशनला सुरुवात केली होती. या कोम्बिंग ऑपरेशनच्या माध्यमातून रेकॉर्डवर असणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना पुन्हा एकदा पोलीस स्टेशनला आणून समज दिली जात होती. तसेच अनेकांची धिंड देखील काढली जात होती. परंतु याच कोम्बिंग ऑपरेशनचा देखील बट्ट्याबोळ झाल्याचे चित्र पाहायला मिळतंय.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होऊनही आरोपी मात्र फरार आहेत. एकीकडे पुणे पोलिस आयुक्त  पुणे भयमुक्त करू, महिला सुरक्षित आहेत असा कितीही दावा करत असले तरी शहरातील नागरिकांच्या मनातील भीती जात नाही. त्यामुळे आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते आहे.