प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
कोल्हापूर : प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोरटकरने इंद्रजीत सावंत यांना धमकी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याने कोरटकर याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. कोल्हापूर पोलिसांनी कोरटकरला अटक केली. त्यानंतर न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिवरायांचा अपमान केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला कोल्हापूर पोलीस स्थानकात आणले गेले. या प्रकरणावर आज कोल्हापूर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पोलिसांनी कोरटकरच्या सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र न्यायालयाकडून त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. शिवरायांचा अवमानप्रकरणी त्याला 28 मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान इंद्रजीत सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, कोरटकर यांने पोलीस तपासात मदत केली नाही. सावंत यांना फोनवरून धमकी दिलेला आवाज माझा नाही, असा दावा कोरटकरने न्यायालयात केला. त्यामुळे त्याच्या आवाजाचे नमुने घेणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आम्ही सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. वकील असीम सरोदेंकडून इंद्रजित सावंत यांची बाजू मांडली. कोरटकरने मोबाईलद्वारे धमकी दिली असल्याचे सरोदे यांनी म्हटले. आरोपीला ज्यांनी सहकार्य केलं त्यांची चौकशी करा अशी मागणी सरोदे यांनी न्यायालयाकडे केली. तसेच प्रशांत कोरटकरला पोलिसांनी सात दिवसांची कोठडी मागितली आहे. कोरटकरने शिवरायांचा अपमान केल्याची माहिती पोलिसांनी न्यायालयात दिली. पळून गेलेल्या वाहनाची चौकशी करायची आहे तसेच मालकाचीही चौकशी करायची आहे असे पोलिसांनी म्हटले आहे. पोलिसांची मागणी विचारत घेऊन कोरटकरला सात दिवसांची पोलीस कोठडी द्या असे सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.