पुण्यातील औंध परिसरात मोठा अनर्थ झाला. राहुल हॉटेल

Pune Accident : खड्ड्यामुळे मोठा अनर्थ, दुचाकी घसरली; ज्येष्ठ नागरिकाला कारने चिरडलं

रोहन कदम. प्रतिनिधी. पुणे: पुण्यातील औंध परिसरात मोठा अनर्थ झाला. राहुल हॉटेलसमोरून गाडी चालवताना खड्ड्यामुळे एक गाडी घसरली, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाचे तेल घसरले आणि खाली पडले. दुर्दैव म्हणजे, नेमकं याच दरम्यान त्यांच्या मागे असलेल्या एका कारने ज्येष्ठ नागरिकाला चिरडले. या घटनेमुळे, संबंधित ज्येष्ठ नागरिकाचा जागीच अंत झाला. या घटनेमुळे, परिसरात एकच खळबळ उडाली. 

नेमकं प्रकरण काय?

औंध परिसरात असलेल्या राहुल हॉटेलसमोरून गाडी चालवताना रस्ता आणि पेविंग ब्लॉकच्यामध्ये खड्डा झाल्याने जगन्नाथ काशिनाथ काळे (वय: 61) यांचा तोल घसरला. या दरम्यान, ते खाली पडले. मात्र, तेवढ्यात जगन्नाथ काळे यांच्या मागून येणाऱ्या कारने त्यांना चिरडले. त्यामुळे, जगन्नाथ काळे यांचा जागीच मृत्यू झाला. या संपूर्ण अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला. या घटनेमुळे, परिसरात एकच खळबळ उडाली.