Pune Job: पुणेकरांसाठी महापालिकेत काम करण्याची सुवर्णसंधी, लवकरच होणार भरती सुरु
पुणे: पुणे महानगरपालिकेत कनिष्ठ अभियंता वर्ग-3 या पदांसाठी नवीन भरती लवकरच सुरु होणार आहे. साधारण रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून सर्व तयारी पूर्ण झाली आहे. याापूर्वी काही ताांत्रिक कारणांमुळे जाहिरात थोड्या विलंबाने प्रसिद्ध झाली असल्याचे महापालिकेनेे सांगितले आहे. ही परीक्षा घेण्याचे काम आयबीपीएसकडे सोपवण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रिया राबवण्याचे काम आयबीपीएस करणार आहे. परंतु काही तांत्रिक प्रक्रिया अजून शिल्लक असल्याने जाहिरात येण्यास विलंब झाला आहे.
याआधी जाहीर झालेल्या भरतीसाठी एकूण 27 हजार 879 उमेदवरांनी अर्ज केले होते. या अर्जांमध्ये काही उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली होती. त्यामुळे ते पात्र ठरले नाहीत. पण राज्य सरकारने त्यांनाा पुन्हा अर्ज करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे आता या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी उमेदवारांना मिळाली आहे.
हेही वाचा: Mumbai: न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन! वांद्रे तलावाजवळ कबुतरांना खायला घालणाऱ्या 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल याशिवाय उमेदवारांना आपला जाती प्रवर्ग सुधारण्याची संधी देखील देण्यात आली होती. सामाजिक किंवा समांतर आरक्षणाचा प्रवर्ग बदलण्यासाठी प्रशासनाने उमेदवारांना 12 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती. या संधीचा लाभ घेण्यासाठी 4 हजार 499 उमेदवारांनी अर्ज केले आहेत, असे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. सुरुवातीला ही मुदत 30 ऑगस्टपर्यंत होती. मात्र ही मुदत वाढविण्यात आली.
प्रशासनाने पुढील आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होईल आणि उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण सुविधा उपलब्ध होईल. यासाठी महापालिकेकडून योग्य मार्गदर्शनही केले जाणार आहे.
महापालिकेच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता ठेवणे हे उद्दिष्ट असल्याचे प्रशासनाने सांगितले असून उमेदवारांची निवड पात्रतेनुसार केली जाईल. तसेच परीक्षा प्रक्रियेतील तांत्रिक अडचणी दूर करून भरती वेळेत पूर्ण केली जाईल असेही प्रशासनाने सांगितले आहे. पुण्यातील उमेदवार भरतीसाठी उत्सुक असून अनेकांनी भरतीसाठीची तयारी केली आहे. अर्ज प्रक्रिया सुरू होताच सर्व उमेदवारांना त्याबाबत ईमेल आणि सूचना पाठवण्यात येतील. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपली माहिती आणि कागदपत्रे योग्यरीत्या तयार ठेवणे गरजेचे आहे असे प्रशासनाने म्हटले आहे.