पुण्यातील स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्ष

Pune Rape Case: पुणे बलात्कारप्रकरणी राजकीय मंडळींची प्रतिक्रिया; काय म्हणाले?

पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपोतील शिवशाही बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणामुळे पुणे हादरले आहे. बलात्कारातील आरोपी दत्तात्रय गाडेचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावर राजकीय नेत्यांकडून वारंवार प्रतिक्रिया येत आहे.

पोलीस अलर्ट नव्हते, हा आरोप चुकीचा

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. तक्रारीनंतर लगेच आरोपीची ओळख पटली. आरोपीला लवकरात लवकर अटक केलं जाईल असे राज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटले आहे. पोलीस अलर्ट नव्हते, हा आरोप चुकीचा आहे. पोलिसांनी स्वारगेट बस स्थानकात गस्त घातलेली होती. सुरक्षारक्षकांकडून हलगर्जीपणा झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. घटना लपवण्याचा प्रयत्न झाला नाही, केवळ गुप्तता पाळली आहे. स्वारगेट बस स्थानकात खासगी सुरक्षारक्षक असतात. खासगी सुरक्षारक्षकांनी हलगर्जीपणा केल्याचं दिसतंय असे योगेश कदम यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : Pune Bus Rape Case: पुणे बलात्कार प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची अजब युक्ती

महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं

पुणे अत्याचार प्रकरणावरुन राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. गेल्या 3 वर्षांपासून महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. महिलांचं अपहरण, हत्या, अत्याचाराची प्रकरणं वाढली आहेत. सत्ताधारी पक्षातील महिला नेत्या आता काय करत आहेत? अशी टीका खासदार संजय राऊतांनी केली आहे.

'गृहखात्याचा राज्यात धाक राहिला नाही'

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी पुण्यात झालेल्या बलात्कारप्रकरणी बोलताना गृहखात्याचा राज्यात धाक राहिला नाही असे म्हटले आहे. पुणे प्रकरणावर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. तसेच स्वारगेट अत्याचाराचा मुद्दा विधानसभेत उचलणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा : अनंत अंबानींच्या वंताराला मिळाला प्राणी मित्र पुरस्कार

स्वागरगेट डेपोतील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार

पुण्यातील शिवशाही बसमधील अत्याचार प्रकरण चांगलेच गाजते आहे. स्वागरगेट डेपोतील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात आज बैठक घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यासंदर्भात मंत्रालयात तातडीनं बैठक बोलावण्यात आली आहे.

पुणे अत्याचार प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सवाल

पुण्यात 26 वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य केले आहे. पुण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बस आगार प्रमुखांनी पोलिसांना पत्र लिहिलं होतं. पत्र लिहूनही पोलिसांनी कारवाई न केल्याचा दावा खासदार सुळे यांनी केला आहे.

हेही वाचा : Rape Case: बापानेच केलं पोटच्या मुलींसोबत असे कृत्य वाचून होईल संताप

शिवशाही बसमधील अत्याचाराविरोधात शरद पवार गटाने आंदोलन केले आहे. स्वारगेट बस डेपोबाहेर हे आंदोलन केले आहे. आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी त्यांनी केली आहे. शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारातील आरोपी गाडे आरोपी मुळचा शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी असून धक्कादायक बाब म्हणजे आरोपी पुण्यात दुष्कृत्य करून आपल्या गावात सकाळी 11 वाजता पोहचला. पाच वाजेपर्यंत घरी विश्रांती घेऊन तो गावातच मुक्काम केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच गाडेवर पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गुन्हे सुद्धा दाखल आहेत. आरोपी गाडे सध्या फरार झाला असून त्याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पुणे पोलिसांकडून ड्रोनद्वारे शोध गाडेचा शोध सुरू आहे.  दत्तात्रय गाडे उसाच्या शेतात लपल्याची माहिती सूत्रांची माहिती आहे.