Rahul Gandhi on Savarkar Defamation Case: 'पुण्यात यायला असुरक्षित वाटतं'; न्यायालयात हजर राहण्यावरून राहुल गांधींचं धक्कादायक वक्तव्य
पुणे: काँग्रेस नेते राहुल गांधी त्यांच्या राजकीय वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. अशातच, राजकीय वर्तुळात राहुल गांधींची जोरदार चर्चा सुरू आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुणे कोर्टात खटला सुरू आहे. अशातच, या खटल्यात नाट्यमय वळण पाहायला मिळालं. पुणे कोर्टात राहुल गांधी यांच्या वतीने असा दावा करण्यात आला की, 'पुण्यात येण्यास त्यांना असुरक्षित वाटत आहे'. मात्र, हा दावा केल्यानंतर राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकले. राहुल गांधींनी पुण्यात यायला असुरक्षित वाटत असल्याचा दावा मागे घेण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर पुणे कोर्टात खटला सुरू आहे. या घटल्यासाठी राहुल गांधींना न्यायालयात हजेरी लावावी लागणार होती. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचे वकिल मिलिंद पवार यांनी पुणे कोर्टात असा दावा केला की, 'पुण्यात येण्यास त्यांना असुरक्षित वाटत आहे'. मात्र, हा दावा केल्यानंतर राहुल गांधी वादाच्या भोवऱ्यात अडकले. एकीकडे, विरोधकांनी राहुल गांधींवर टीकेचा वर्षाव केला तर दुसरीकडे, कॉंग्रेसने राहुल गांधींची बाजू घेतली.
तसेच, वाद उफाळल्यावर वकील मिलिंद पवारांनी स्वत:चा दावा फिरवल्याने त्यांना दोषी ठरवण्यात आले. 'न विचारता वकिलाने परस्पर दावा केला', अशी बचावात्मक भूमिका कॉंग्रेस पक्षाने घेतली. तसेच, वकील मिलिंद पवारांनी त्यांचा दावा मागे फिरवण्याचे आदेशही पुणे कोर्टातर्फे देण्यात आले. अशातच, आता या प्रकरणात पुढे काय घडतं, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.