नवी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक अजब प्रकार प

Navi Mumbai : उंदराने खाल्लेले आईसक्रीम ग्राहकांना; सीवूड्स मॉलमध्ये अजब प्रकार

कविता लोखंडे. प्रतिनिधी. नवी मुंबई: नवी मुंबईतील एका प्रसिद्ध मॉलमध्ये एक अजब प्रकार पाहायला मिळाला. मॉलमधील एका आईस्क्रीम शॉपमध्ये चक्क उंदीर आईसक्रीम खात असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नवी मुंबईतील सीवूड्स मॉलमध्ये असलेल्या 7-इलेव्हन स्टोअरमध्ये ही घटना घडली. 

या व्हिडिओमध्ये आईस्क्रिमवर उंदीर फिरताना आणि चाटताना दिसत आहेत. तसेच, ही घटना घडल्याने अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यासह, या मॉलमध्ये असा प्रकार घडल्याने ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.