सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेर

सोने- चांदीच्या दरात विक्रमी वाढ; दागिने खरेदी ग्राहकांच्या आवाक्याबाहेर

जळगाव: सोन्याचा दर पुन्हा एक लाखांच्या पार गेला आहे. अमेरिकेने टेरीफ लावल्याने भाव वधारल्याची चर्चा आहे. जीएसटीसह आजचा सोन्याचा भाव एक लाख एक हजार रुपये आहे. तर चांदीचा भाव जीएसटीसह 1 लाख 15 हजार रुपये इतका आहे. चांदीनेही विक्रमी वाढ गाठली आहे. 

जळगावच्या बाजारात सोने-चांदीने केला एक लाखांचा टप्पा पार  रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अनेक देशांना टेरीफ वार लावणे बाबत इशारा दिला असून त्याचा परिणाम जळगावच्या सुवर्णनगरीवर झाला आहे. जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव जीएसटीसह 1लाख 1 हजार रुपये, तर चांदीचे भाव जीएसटी सह 1 लाख 15 हजार रुपये झाला आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने अनेक देशांना टेरीफ वार लावणे बाबत इशारा दिल्याचा परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दराने एक लाख रुपयांच्यावर टप्पा गाठला असताना चांदीनेही विक्रमी दराची उंची गाठली असून जळगाव सुवर्ण नगरीत आज सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 1 हजार रुपये तर चांदीचे दर हे 1 लाख 15 हजार रुपये इतक्या उंचीवर जाऊन पोहोचले आहेत. 

हेही वाचा: हुंड्यासाठी विवाहितेची विष पाजून हत्या, नातेवाईकांचा संताप; प्रेत 18 तास पोलीस ठाण्यातच

सोन्याचे वाढलेले दर सर्वसामान्य ग्राहकांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. आजच्या दिवसात सोने आणि चांदी खरेदी करणे हे स्वप्न असल्याचे सांगत सोन्याचे दर कमी करण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवे अशा प्रतिक्रिया ग्राहकांनी दिल्या आहेत