कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्

Arun Gawli Release From Nagpur Jail: अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी'ला 18 वर्षांनंतर दिलासा; अरुण गवळीची नागपूर तुरुंगातून सुटका

Arun Gawli Release From Nagpur Jail: शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी उर्फ ‘डॅडी’ याची नागपूर मध्यवर्ती कारागृहातून सुटका झाली आहे. तब्बल 18 वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर गवळीला मोठा दिलासा मिळाला. 

हेही वाचा - Arun Gawli : शिवसेना नगरसेवक हत्येप्रकरणी अरुण गवळीला दिलासा; तब्बल 18 वर्षांनंतर जामीन मंजूर

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठाने गवळीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना त्याचे वय, तब्बल 18 वर्षांहून अधिक कारावास आणि अपील प्रलंबित असल्याचे लक्षात घेऊन जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे.

हेही वाचा - Cyber Crime : 'तुमचा नंबर पहलगाम हल्ल्यात वापरलायं, अटक करावी लागेल'; राजधानीत वृद्ध महिलेला फसवून 43 लाख लुटले

कमलाकर जामसांडेकर यांची 2007 मध्ये घाटकोपरमध्ये त्यांच्या घरात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्या वेळी गवळी आमदार होते. या खून प्रकरणात गवळीसह 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. अरुण गवळी 2004-09 या काळात आमदारही होते. त्यांच्या सुटकेला मुंबईतील आगामी बीएमसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यांची मुलगी गीता गवळी देखील सक्रिय राजकारणात आहेत.