प्रांजल खेवलकरांच्या अटकेनंतर रोहिणी खडसेंनी सोडलं मौन; काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
पुणे: पुण्यातील रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी रविवारी छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांनी एकनाथ खडसे यांच्या जावयांसह आरोपींना अटक केली. यानंतर प्रकरणावर बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आल्या. एकनाथ खडसेंनीही यावर भाष्य केले. मात्र प्रांजल खेवलकरांच्या पत्नी रोहिणी खडसेंनी यावर मौन बाळगले होते. आज रोहिणी खडसेंनी नवरा प्रांजलच्या अटकेवर भाष्य केलं आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असल्याचे रोहिणी यांनी म्हटले आहे.
पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी मौन सोडले आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर आहे असे त्यांनी नवऱ्याच्या अटकेवर म्हटले आहे. पुण्यातील खराडी परिसरात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर छापा टाकला. या छापेमारीत रोहिणी खडसे यांच्या पतीला अटक करण्यात आली. प्रांजल खेवलकर यांच्या अटकेनंतर चर्चांणा उधाण आले. राजकीय नेत्यांनी यावर भाष्य केले. रोहिणी खडसे नवऱ्याच्या अटकेवर काय बोलतील याकडे सगळ्यांचे लक्ष होते. मात्र त्यांनी रविवारी या प्रकरणावर एक अक्षर काढले नाही.
हेही वाचा: Nag Panchami 2025: नागपंचमीची पूजा कशी करतात, चुकूनही 'या' गोष्टी करु नये
रोहिणी खडसे यांनी पती प्रांजल खेवलकर यांच्या अटकेवर भाष्य केलं आहे. रोहिणी यांनी एक्स पोस्ट करत प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल ! जय महाराष्ट्र! अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
पुण्यातील रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू होती. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्काचे सेवन करण्यात होते. खराडी भागातील एका फ्लॅटमध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. या पार्टीतून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या छापेमारीत अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त करण्यात आली होती. यानंतर आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांचा समावेश आहे.