नुकताच आदित्यराज यांनी सातारा - कोल्हापूर महामार्ग

Viral Video: ग्रामविकास मंत्र्याच्या मुलाची स्टंटबाजी; राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीवरून केला स्टंट

सातारा: सध्या अनेक नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत. अशातच, मंत्र्यांचे अनेक व्हिडिओदेखील व्हायरल होत आहेत. मात्र, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सुपुत्र आदित्यराज गोरे वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. नुकताच आदित्यराज याने सातारा - कोल्हापूर महामार्गावर अतिशय धोकादायक पद्धतीने बाईक स्टंटबाजी करतानाचे कथित व्हिडिओ समोर आले आहेत. आदित्यराज याने केलेल्या बाईक स्टंटबाजीमुळे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका होत आहे. या प्रकारानंतर आदित्यराज याने संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावरून काढून टाकले. 'जर सर्वसामान्य लोकांनी असे कृत्य केले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, एखाद्या मंत्र्याच्या मुलानेच असे कृत्य केले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होणार की नाही?', असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 'मंत्र्यांच्या मुलांसाठी राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का?', असा सवाल सर्वसामान्य जनतेने विचारला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे हे प्रकरण उघडकीस आले:

भैय्या पाटील नावाच्या एका व्यक्तीने हा व्हिडिओ एक्स (X – पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यामुळे उघडकीस आले. या व्हिडिओमध्ये, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे सुपुत्र आदित्यराज गोरे सातारा - कोल्हापूर महामार्गावर अत्यंत धोकादायक स्टंट करताना दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. भैय्या पाटील यांनी हा व्हिडिओ एक्स (X – पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले, 'ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे सातारा – कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जीविताला धोका निर्माण करत आहे'. 

पुढे भैय्या पाटील म्हटले, 'या स्टंटचे रील्स स्वतःच्या सोशल मीडियावर पोस्ट करून अशा बेकायदेशीर गोष्टींना प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासोबतच, आदित्यराज गोरे याने स्टंट करण्यासाठी वापरलेल्या बाईकला नंबर प्लेटदेखील नाही', असा आरोप त्यांनी केला आहे. 

'राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे सातारा - कोल्हापूर महामार्गावर असे जीवघेणे स्टंट करून स्वत: सोबतच इतर लोकांच्या जीवितालादेखील धोका निर्माण करत आहे', असा आरोप भैय्या पाटील यांनी केला आहे. 

 

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीकेचा वर्षाव:

आपल्या मुलाने केलेल्या बाईक स्टंटबाजीमुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर राज्यभरातून टीकेचा वर्षाव होत आहे. या प्रकारानंतर आदित्यराज याने संबंधित व्हिडिओदेखील सोशल मीडियावरून काढून टाकले. मात्र, या प्रकरणामुळे मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर टीका करण्यासाठी विरोधकांना संधी मिळाली. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर एक केली. त्यासोबतच त्यांनी राज्याचे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षमतेवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे राज्याचे राज्याचे गृहमंत्री आहेत का? आता त्यांनीच ठरवावे हे काय सुरू आहे', असा सवाल करत शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. तर दुसरीकडे, 'मंत्र्यांच्या मुलांसाठी राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का?' असा सवाल सर्वसामान्य जनतेने मंत्री जयकुमार गोरे यांना विचारले आहे.