संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटावर टीका करताना 'ताटा

'ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं' संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर घणाघात

मुंबई: मनसे नेते संदीप देशपांडे यांनी पुन्हा एकदा आपली ठाम भूमिका मांडत उद्धव ठाकरे गटातील नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. 'ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं, बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये' अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटातील प्रवक्त्यांवर निशाणा साधला.

देशपांडे यांनी आपल्या वक्तव्यात म्हटलं की, 'ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्ही, आम्हालाच सल्ला दिला जातो की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे, ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं.' हेही वाचा:उद्धव ठाकरेंना राणे समर्थकांनी डिवचलं; वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर फलकबाजी

'जे काही बोलायचं आहे ते आमचे आणि तुमचे पक्षप्रमुख बोलतील. तुम्ही फक्त चमचेगिरी आणि चमकोगिरी करताय, ती थांबवा,' असंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यांच्या या वक्तव्यातून ठाकरे गटातील नेत्यांवरचा रोष स्पष्टपणे दिसून आला.

सध्या महाराष्ट्रात युती, विरोधक आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काही ठाकरे गटाचे नेते मनसेच्या भूमिकांवर वारंवार टीका करत होते. त्याचाच प्रतिउत्तर म्हणून संदीप देशपांडे यांनी ही प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली.