मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी सं

90% साहित्यिक हे पुरस्कारासाठी लाचार आहेत; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

Sanjay Raut Slams BJP: मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या मुद्द्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे. 'साहित्यिकांशी चर्चा करण्याची गरज नाही. किती साहित्यिक छाती पुढे काढून आले? कोण साहित्यिक? देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावं माहीत आहेत का? एकनाथ शिंदे यांना तरी पाच साहित्यिक माहिती आहेत का?' असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. राऊत म्हणाले की, जर साहित्यिकांना मराठी भाषेबाबत खरंच चिंता वाटत असेल, तर हिंदी भाषा जबरदस्ती लादली जात असताना ते उठून का बोलले नाहीत? 'आज जे साहित्यिक मराठीवर बोलत आहेत, ते हिंदीच्या विरोधात बोलले का?' असा प्रश्नही त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, 'कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले, माधुरी दीक्षित? कुठे आहेत मराठी क्रिकेटपटू? मराठी माणसाने यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या, खांद्यावर उचलून घेतलं. पण आज मराठीवर संकट आहे, तेव्हा हे सगळे गप्प का?' हेही वाचा: महापालिका प्रशासनाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे अन्नत्याग आंदोलन फडणवीसांवर निशाणा साधत ते म्हणाले, 'साहित्यिकांचा आम्हाला सांगू नका. आम्हाला माहिती आहे 90% लोक हे पुरस्कारासाठी लाचार आहेत. यांच्या मुला-बाळांनी परदेशात शिक्षण घेतलंय. त्यांना ना मराठीचा, ना हिंदीचा गंध आहे.' 'भारतीय जनता पक्षातले बहुतांश नेते इंटरनॅशनल शाळांमध्ये आपल्या नातवंडांना घालतात. मी अभिमानाने सांगतो की माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या. त्यामुळे मला अधिकार आहे बोलण्याचा.' 'तुमच्या मंत्र्यांची, भाजपवाल्यांची आणि साहित्यिकांची मुलं इंग्रजी शाळेत शिकतात. मग तुम्ही मराठीच्या नावाखाली बैठकांचा खेळ का करताय? हेच मराठीचा अपमान आहे,' अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली.