भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपाचे नेते नारायण राणे य

नारायण राणेंच्या दाव्यावर संजय राऊतांचं स्पष्टीकरण

मुंबई : राज्यात दिशा सालियन प्रकरण डोकेवर काढू लागेल आहे. पाच वर्षानंतर पुन्हा हे प्रकरण बाहेर आले आहे. दिशा सालियनचे सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून त्यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर पुन्हा या प्रकणावर नेतेमंडळींनी भाष्य करण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी भाजपा प्रदेश कार्यालयात भाजपाचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आदित्यला वाचवण्यासाठी ठाकरेंनी विनंती केल्याचा खळबळजनक खुलासा केला होता. यावर आज राऊतांनी स्पष्टीकरण दिले आहे.    'नारायण राणेंना ठाकरेंनी कोणताही फोन केला नाही'

दिशा सालियन प्रकरणात दिशाचे वडिल सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे त्यांनी आदित्यवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर आदित्य ठाकरेंवर टीका होण्यास सुरूवात झाली. भाजपा ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आदित्यला वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी विनंती केल्याचा खुलासा केला. तसेच ठाकरेंनी मला फोन करुन विनंती केली होती असा पुनरुच्चार नारायण राणे यांनी दिशा सालियन प्रकरणावर केला. यावर नारायण राणे यांना उद्धव ठाकरेंनी कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्टीकरण ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.   हेही वाचा : नाशिकच्या पालकमंत्रीपदावर मुख्यमंत्र्यांनी टाकला पडदा; कोण होणार नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री?

पुढे राऊत म्हणाले, सुशांत सिंह राजपूत, दिशा सालियनची आत्महत्याच झाली आहे. दोघांच्या आत्महत्यांचा वापर ठाकरे कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी केला जात आहे. जसं औरंगजेबाच्या कबरीचं राजकारण सुरू आहे तसंच मृतांचंही आहे. भाजपा नेते मृत्यूचाही वापर राजकारणासाठी करतात अशी टीका खासदार राऊत यांनी केली आहे. 

दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय म्हटलं?  दिशाचा मृत्यू हा अपघाती झाला असं भासवण्यात आलं मात्र तिचा मृत्यू नसून तिच्यावर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आहे. माजी महापौर, मालवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी सांगत असेलली गोष्ट खरी असल्याची भासवत होते. याच लोकांनी माझ्या कुटुंबाला दबावाखाली आणि नजरकैदेत ठेवलं होतं. आमच्या प्रत्येक हालचालींवर त्यांची नजर होती. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी महाराष्ट्राबाहेर सुनावणी घ्या. 8 जून 2020ला दिशाच्या घरी झालेली पार्टी होती. आदित्य ठाकरेंसह सूरज पांचोली, दिनो मोर्यावरही याचिकेतून गंभीर आरोप करण्यात आले. दिशाचा सामूहिक बलात्कार करून खून करण्यात आला. बलात्काराचा उल्लेख शवविच्छेदन अहवालातून गायब आहे. दिशा करिअरसाठी खूप गंभीर होती, आत्महत्या करणंच शक्य नाही. दिशाचा मृत्यू अपघाती झाल्याचं भासवण्यात आलं. माजी महापौर किशोरी पेडणेकरांकडून राजकीय दबाव आणला गेला. सामुहिक बलात्कार आणि हत्या दडपण्यासाठी साक्षी पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, शवविच्छेदन अहवाल बनावट तयार केले गेले. दिशाचा मृतदेह बंद दाराआडून हलवून तो बाहेर फेकून 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याचं दाखवलं. दिशाच्या मृतदेहावर घटनेशी साधर्म्य दाखवणाऱ्या कुठल्याही खुणा नव्हत्या. गँगरेपच्या खुणा मिटवण्यासाठीच मुंबई पोलिसांनी दिशाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यास 50 तासांचा उशिर केला. निष्पक्ष कारवाई होण्यासाठी तपास अधिकारी म्हणून समीर वानखेडेंची नेमणूक करावी असं सतिश सालियान यांनी याचिकेत म्हटले आहे.