संत मुक्ताबाईंची पायी दिंडी पालखी मराठवाड्यात दाखल
जालना: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केलाय. ज्ञानोबा तुकाराम, आदी शक्ती मुक्ताईबाईचा गजर करत भगवी पताका हाती घेत ऊन, वारा पावसाची तमा न बाळगता मराठवाड्यात दाखल झाली आहे. आदिशक्ती संत मुक्ताईच्या 318 व्या मुक्ताईनगर ते पंढरपूर आषाढी वारी पालखी सोहळ्याचे 6 जून रोजी संत मुक्ताई मुळ मंदिर येथून प्रस्थान झाले.
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमधून निघालेल्या संत मुक्ताबाईच्या पालखीचे जालना जिल्ह्यात आगमन झाले आहे. जालना जिल्ह्यातल्या वाघ्रुल घाटातून पालखीने मराठवाड्यात प्रवेश केला आहे. फुलांनी सजवलेल्या रथात चांदीच्या पादुका ठेवून पालखी मुक्ताईंच्या व संतांच्या जयघोषात प्रवास करत आहे. मुक्ताईचा पालखी सोहळा हा 600 किमी अंतर कापून पंढरपूरमध्ये दाखल होत असतो. जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या सहा जिल्ह्यातून हा पालखीचा प्रवास असतो. 30 दिवसांच्या प्रवासानंतर 3 जुलैला मुक्ताईंची पालखी पंढरपूरमध्ये दाखल होत असते. विठु नामाच्या गजरासह काळ्या आईची चिंता सावळ्या विठ्ठलाला असं म्हणत, मराठवाड्यातील शेतकरी या वारीत सामील होत असतो.