'आम्हाला माहिती आहे की औरंगजेब किती नालायक होता' - जरांगे
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आज 3 महिने पूर्ण झाले असून, या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळेला फरार करण्यात धनंजय मुंडेंचा हात असल्याचा आरोप मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. "जर देवेंद्र फडणवीस यांनी फक्त एवढे म्हटले की धनंजय मुंडेला आरोपी करा, तर एका तासात तो आरोपी ठरेल," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडेंविरुद्ध पुरेसे सबळ पुरावे आहेत. "धनंजय मुंडे हे कलम 302 अंतर्गत मुख्य आरोपी होतील एवढे पुरावे उपलब्ध आहेत, मात्र सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे," असा गंभीर आरोप त्यांनी केला. "मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत की, त्याच्याविरुद्ध पुरावे सापडले नाहीत," असा आरोपही त्यांनी केला.
धनंजय मुंडे एका तासात सहआरोपी होतील – जरांगे "तपास यंत्रणेकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात पुरेसे सबळ पुरावे आहेत. मात्र, सरकार त्यांना वाचवत आहे. जर फडणवीस साहेबांनी सांगितले की धनंजय मुंडेला सहआरोपी करा, तर एका तासात ते सहआरोपी ठरतील."
भारत विरूद्ध न्यूझीलंड सामन्यात कोण जिंकणार?
या प्रकरणात धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. तसेच, वाल्मिक कराड हा या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे धनंजय मुंडेंना सहआरोपी करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
"औरंगजेबाची कबर काढायची तर काढा" – मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर हल्लाबोल यावेळी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करत औरंगजेबाच्या कबर प्रकरणावरून सरकारला धारेवर धरले. "40 वर्षे कुठे होतात? आता महापालिका निवडणुका आल्या म्हणून हा विषय काढला जात आहे," असा आरोप त्यांनी केला.
त्यांनी पुढे वक्त बोर्डावर आणि कबरींवर होणाऱ्या सरकारी खर्चावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. "आमच्या-आमच्यात भांडणे लावण्याचा हा खेळ सरकार खेळत आहे," असा आरोप करत, "औरंगजेबाने इथल्या मुसलमानांना डाग लावला, आम्हाला माहिती आहे की औरंगजेब किती नालायक होता," असेही ते म्हणाले.
"आम्हाला माहिती आहे, कधी कबर काढायची आणि आमचे मावळे त्यासाठी सक्षम आहेत," असे सांगत त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.