शरद पवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. या

Sharad Pawar : माझ्याकडे 2 माणसं आले होते, 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी; शरद पवार यांचा मोठा गौप्यस्फोट

 

नागपूर: शरद पवार यांनी नागपूर येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी विधानभा निवडणुकीपूर्वी एक व्यक्ती आला आणि 160 जागा निवडून देण्याची गॅरंटी दिली असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी केला. पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. 

शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वीचा एक किस्सा सांगितला आहे. "खर सांगायचं झालं तर आम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या. त्याआधी दिल्लीत दोन लोक मला भेटायला आले. त्यांची नाव पत्ते आता माझ्याकडे नाहीत. मी त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं. महाराष्ट्रात 288 विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी 160 जागा आम्ही तुम्हाला निवडून देण्याची गॅरंटी देतो" 

पुढे बोलताना, "निवडूक आयोग या संस्थेबद्दल माझ्या मनात किंचितही शंका नव्हती. त्यामुळे असे लोक येतच असतात म्हणून मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. यानंतर राहुल गांधी आणि त्या लोकांची मी भेट घालून दिली. राहुल गांधींना त्या लोकांनी त्यांचे म्हणणे सांगितले. यानंतर हा आपला मार्ग नाही, आपण लोकांमध्ये जाऊ आणि त्यांचा पाठिंबा घेऊ असा निर्णय आम्ही घेतला " .

हेही वाचा: आरोपी पळाल्याने पोलिसांना दणका; ठाण्यातील 15 पोलीस निलंबित

नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मोठा खुलासा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी काही लोकांनी आम्हाला 288 पैकी 160 जागा निवडून देण्याची गॅरंटी दिल्याची माहिती पवारांनी दिली. पवारांच्या खुलाशानंतर राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आले आहे. पवार यांनी केलेल्या वक्तव्याने थेट निवडणुक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. 

दरम्यान दोन व्यक्ती पवार साहेब यांच्याकडे गेले होते. 160 जागांवर मतांची फेरफार करण्याबाबत त्यांनी सांगतलं होतं. मतदार यादीत घोळ निर्माण करण्यासाठी ते दोन व्यक्ती पवार साहेबांकडे आले होते. महाराष्ट्रात 76 लाख मतदार वाढले. शेवटच्या टप्प्यात वाढलेले मतं, यावर मी बोलत होतो. निवडणूक आयोगाने याची दखल घेतले नाही असाही आरोप जितेंद्र आव्हाड यांनी निवडणुक आयोगावर केला आहे.